जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नपत्रिकेने वेधलंय लक्ष; 'या' गोष्टीवरुन मिळाली हटके आयडिया

Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नपत्रिकेने वेधलंय लक्ष; 'या' गोष्टीवरुन मिळाली हटके आयडिया

Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नपत्रिकेने वेधलंय लक्ष; 'या' गोष्टीवरुन मिळाली हटके आयडिया

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झाली आहे. सध्या सर्वांचं लक्ष रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाकडे लागलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 सप्टेंबर-   बॉलिवूडमधील लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. गेल्या काही महिन्यात अनेक मोठमोठ्या कलाकारांनी लग्न करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. यामध्ये आलिया भट्ट रणबीर कपूर, कतरिना कैफ विकी कौशल यांचा समावेश होतो. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झाली आहे. सध्या सर्वांचं लक्ष रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाकडे लागलं आहे. रिचा आणि अली 4 ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. नुकतंच या दोघांनी आपली लग्नपत्रिका शेअर करत सर्वांना चकित केलं होतं. आपल्याला अशा हटके लग्नपत्रिकेची कल्पना कशी सुचली याचा खुलासा त्यांनी केला आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल हे बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिनधास्त कपल्स म्हणून ओळखले जातात. त्यांनी नेहमीच आपलं नातं उघडपणे कबुल केलं आहे. सध्या ते आपल्या लग्न पत्रिकेमुळे प्रचंड चर्चेत आहेत. या हटके कपलने जुन्या काळातील माचीसच्या डबीसारखी लग्नपत्रिका बनवली आहे. या निमंत्रण पत्रिकेवर दोन्ही स्टार्सचे स्केच माचिसच्या पेटीवर बनवण्यात आले आहेत. या कार्डवर ‘कपल मॅचेस’ असं लिहलं आहे. या लग्न पत्रिकेवर अली फजल सूट बूटमध्ये दिसत आहे. तर अभिनेत्री रिचा चड्ढा लाल रंगाच्या साडीत दिसून येत आहे. ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. आता रिचा चड्ढा अली फजलच्या कार्ड डिझायनरने या अनोख्या लग्नपत्रिकेमागचं गुपित उघड केलं आहे. या हटके कार्डची थीम पुनीत गुप्ता यांनी डिझाइन केली आहे. आउटलुकला दिलेल्या मुलाखतीत पुनीत यांनी सांगितलं की, ऐंशीच्या दशकानुसार लग्न समारंभाची रचना करणं थोडं कठीण होतं. त्यासाठी जुन्या भारतीय चित्रपटांच्या पोस्टर्समधून आपल्याला प्रेरणा मिळाली. तसेच या पत्रिकेला रेट्रो बॉलिवूड टच देण्यात आला आहे. त्यामुळे रिचा आणि अलीला ही भन्नाट कल्पना प्रचंड आवडली.

News18लोकमत
News18लोकमत

रिचा चढ्ढा आणि अली फजल गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघे पहिल्यांदा 2012 मध्ये ‘फुक्रे’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या सेटवरुन त्यांच्या मैत्रीची आणि प्रेमाची सुरुवात झाली होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. **(हे वाचा:** VIDEO: सुष्मिता सेनच्या वहिनीने सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा; हे ठरलं घटस्फोटाचा निर्णय बदलण्याचं कारण ) दोघेही याआधीच लग्न करणार होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी आपलं लग्न लांबणीवर टाकलं होतं. येत्या 30 सप्टेंबरपासून या दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु होणार आहेत. यामध्ये कॉकटेल, मेहंदी, यांसारखे प्री वेडिंग फ़ंक्शन होणार आहेत. रिचाला आपल्या लग्नात शाही लुक हवा आहे. त्यासाठी अनेक डिझायनर्स एकत्र मिळून हा पोशाख बनवत आहेत. अभिनेत्रींच्या पोशाखाला मिळता-जुळता अलीचा पोशाख असणार आहे. चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता लागून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात