'उन्नाव महिलांसाठी नरक झालं आहे', दलित मुलींच्या मृत्यूवर अभिनेत्रीचा संताप

'उन्नाव महिलांसाठी नरक झालं आहे', दलित मुलींच्या मृत्यूवर अभिनेत्रीचा संताप

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूमुळं खळबळ उडाली आहे. चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या.

  • Share this:

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूमुळं खळबळ उडाली आहे. चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडल्या होत्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Dalit Girls Found Dead) दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadda) हिने संताप व्यक्त केला आहे. उन्नाव महिलांसाठी नरक झाला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया तिनं दिली.

“स्वर्ग आणि नरक दोन्ही पृथ्वीवरच आहेत. उन्नव महिलांसाठी नरक आहे. जगण्यासाठी संघर्ष करत असलेल्या त्या मुलीसाठी प्रार्थना करा. अशा घटना वारंवार घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करायला हव्या. उन्नावचं हाथरस प्रकरणाप्रमाणे होता कामा नये. दोषींना त्वरीत शिक्षा द्या.” अशा आशयाचं ट्विट करुन रिचानं आपला संताप व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा - ‘शंकरपाळ्या बोललास तर याद राख;’ चला हवा येऊ द्यामधील कलाकारांचं झालं भांडण

उन्नावचे पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन मुलींचा रुग्णालयात मृत्यू झाला असून एकीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुली चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. डॉक्टरांनी विषप्रयोग झाल्याची लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं आहे. आमचा तपास सुरु आहे”.

Published by: Mandar Gurav
First published: February 18, 2021, 11:20 AM IST

ताज्या बातम्या