मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या मेहंदी समारंभात थिरकली रिया चक्रवर्ती, डान्सचा VIDEO तुफान VIRAL

फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या मेहंदी समारंभात थिरकली रिया चक्रवर्ती, डान्सचा VIDEO तुफान VIRAL

बॉलिवूड  (Bollywood) अभिनेता फरहान अख्तर  (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर  (Shibani Dandekar) यांचा मेहंदी आणि हळदी सोहळा (Mehandi & Haladi Ceremony)  चांगलाच रंगला. यावेळी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि अनुषा दांडेकर यांच्या डान्सचा एक व्हिडिओ  (Dance Video) समोर आला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 फेब्रुवारी-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता फरहान अख्तर   (Farhan Akhtar)  आणि शिबानी दांडेकर   (Shibani Dandekar)  यांचा मेहंदी आणि हळदी सोहळा  (Mehandi & Haladi Ceremony)   चांगलाच रंगला. यावेळी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि अनुषा दांडेकर यांच्या डान्सचा एक व्हिडिओ   (Dance Video)  समोर आला आहे. ज्यामध्ये दोघीही जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहेत. 17 फेब्रुवारीपासून फरहान-शिबानीच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत.यावेळी अमृता अरोरा, शबाना आझमी, अनुषा दांडेकर आणि रिया चक्रवर्ती यांनी उपस्थिती लावली आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शिबानी दांडेकर या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अशा परिस्थितीत शिबानीच्या आयुष्यातील इतका खास सोहळा रिया मिस करणं शक्यच नाहीय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये रिया आणि अनुषा दांडेकर फरहानच्या अपार्टमेंटमधील टेरेसवर डान्स करताना दिसत आहेत.जास्त अंतरावरून शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये आवाज नीट ऐकायला येत नाहीय. मात्र मेहंदीला उपस्थित सर्व लोक धम्माल करताना दिसत आहेत.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी रिया चक्रवर्तीच्या कठीण काळात तिला खूप साथ दिली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया आयुष्याच्या खूप वाईट टप्प्यातून जात होती. त्यावेळी त्याच्या मित्र-मैत्रिणींनी तिला सपोर्ट केल्याचं दिसून आलं होतं.

(हे वाचा:कोण होती फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानी? का झाला होता घटस्फोट? )

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाह खंडाळा फार्महाऊसवर १९ फेब्रुवारीला होणार आहे. फरहानचे वडील आणि प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी हे लग्न कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले होते. फरहानची आई हनी इराणीसोबतच शबाना आझमीही फरहानच्या लग्नामुळे खूप आनंदी आहेत. जावेद अख्तर आणि हनी इराणी यांना एक मुलगा फरहान अख्तर आहे. तर शबाना आझमी या जावेद यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. हनीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत आपली सून शिबानी दांडेकरचे कौतुक करत दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग असल्याचं सांगितलं आहे.

First published:
top videos

  Tags: Bollywood News, Entertainment, Farhan akhtar, Rhea chakraborty, Wedding