संगीतकार होण्यासाठी ‘या’ गायकानं सरकारी नोकरीवर मारली लाथ

गाण्याच्या वेडापायी त्यांना देखील अनेकांनी टोमणे मारले होते. मानसिक त्रास दिला होता. ज्या ठिकाणी ते नोकरी करायचे तिथे खुद्द बॉस देखील त्यांची खिल्ली उडवायचे.

गाण्याच्या वेडापायी त्यांना देखील अनेकांनी टोमणे मारले होते. मानसिक त्रास दिला होता. ज्या ठिकाणी ते नोकरी करायचे तिथे खुद्द बॉस देखील त्यांची खिल्ली उडवायचे.

  • Share this:
    मुंबई 26 मार्च: कुठल्याही कलेच्या क्षेत्रात प्रसिद्धी आणि पैसा मिळवणं दिसतं तितकं सोपं नसतं. कलाकार कितीही हुशार किंवा मेहनती असला तरी देखील त्याला योग्य संधीची वाट पाहावी लागते. परंतु ती संधी मिळेपर्यंत त्याला खडतर आयुष्य जगावं लागतं. असाच काहीसा अनुभव प्रसिद्ध गीतकार प्रभाकर पोखरीकर (Prabhakar Pokharikar) यांना आला होता. गाण्याच्या वेडापायी त्यांना देखील अनेकांनी टोमणे मारले होते. मानसिक त्रास दिला होता. ज्या ठिकाणी ते नोकरी करायचे तिथे खुद्द बॉस देखील त्यांची खिल्ली उडवायचे. अखेर एकदिवस या सर्व प्रकाराला वैतागून त्यांनी नोकरीवरच लाथ मारली. पाहा काय होता तो किस्सा?... प्रभाकर पोखरीकर यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडिल टेलर होते. त्यामुळं वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय वारसानं त्यांच्याकडे आला. पण ते या कामात रमले नाही. सुरुवातीला त्यांनी टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम केलं. त्यानंतर बीएमसी आणि एमटीएनएलमध्येही नोकरी केली. नोकरीमुळे त्यांना गाण्याच्या कार्यक्रमाला जाता येत नसायचं. त्यामुळे सारख्या दांड्या व्हायच्या. तर कधी कधी उशिरा कामावर यायचे. तर कधी कामावरून लवकर कार्यक्रमासाठी पळायचे. त्यामुळे कामातील सहकारी आणि साहेबांचे टोमणे सुरू झाले. एके दिवशी एमटीएनएलच्या साहेबांनी त्यांना थेट ‘गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो, हमे आपका इंतजार करना पडता है’, असं सुनावलं. पोखरीकर यांना हा अपमान जिव्हारी लागला. साहेबांच्या प्रश्नांचा भडिमार संपताच, ‘कल से आपको मेरा इंतजार नही करना पडेगा’, असं ठणकावत पोखरीकरांनी राजीनामा दिला. अवश्य पाहा - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर  प्रभाकर पोखरीकर हे उत्तम गायकचं नव्हते तर सामाजिक कार्यकर्ता देखील होते. दलित पँथरनं सुरु केलेल्या चळवळींमध्ये भाग घेऊन त्यांनी लोकांची मदत केली. अनेक नव्या गायकांना प्रसिद्ध होण्याची संधी दिली. सोनू निगम याला देखील त्यांनीच संधी दिली होती. त्यांच्या ‘जीवाला जीवाचं दान’ या म्यूझिक अल्बममधील गाणी गाऊन सोनूनं आपलं करिअर सुरु केलं होतं.
    Published by:Mandar Gurav
    First published: