नवी दिल्ली, 9 जानेवारी: बॉलीवुड अभेनता सुशांत सिंह राजपूत (Sushan Singh Rajput) च्या निधनामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सध्या एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर सोशल मीडियासंदर्भात तरुणींना खास संदेश दिला आहे. रिया चक्रवर्ती आता हळुहळू जुन्या आठवणींमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी तिला चाहत्यांचा पाठिंबाही मिळत आहे. दरम्यान, तिने मुलींना सल्ला देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. जी खूप व्हायरल होत आहे. रियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तरुणीं एक संदेश लिहिला आहे. तिने लिहिले की, ‘मी सर्व मुलींना एक आठवण करून देणार आहे. तू आहेस तशी सुंदर आहेस. इन्स्टा ब्युटी आणि फिल्टर्सच्या फंदात पडू नका. मला माहित आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता पण तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटले पाहिजे. खूप प्रेम.’ असा मौलिक सल्ला रियाने तरुणींना दिला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रिया स्वतःला बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तिला आणि त्याच्या कुटुंबाला भूतकाळातील सर्व दु:ख विसरून नव्याने सुरुवात करायची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.