जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘माफ करा बाबा, वेळ जरा कठीण आहे’; रिया चक्रवर्तीनं दिल्या पितृदिनाच्या शुभेच्छा

‘माफ करा बाबा, वेळ जरा कठीण आहे’; रिया चक्रवर्तीनं दिल्या पितृदिनाच्या शुभेच्छा

‘माफ करा बाबा, वेळ जरा कठीण आहे’; रिया चक्रवर्तीनं दिल्या पितृदिनाच्या शुभेच्छा

रिया चक्रवर्तीची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 20 जून**:** आज 20 जून, आजचा दिवस संपूर्ण जगात पितृदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्तानं सर्वसामान्य लोकांसोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील आपल्या वडिलांना फादर्स डे शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केलेली पोस्ट सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. रिया सध्या सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात संशयीत आरोपी आहे. त्यामुळं तिनं केलेल्या या पोस्टवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. “माफ करा, वेळ जरा कठीण, पण बाबा मला तुमच्यावर खूप गर्व आहे. तुम्ही माझी प्रेरणा आहात. अन् तुम्हीच माझी सहनशक्ती. माझ्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा”. अशा आशयाची पोस्ट रियानं केली. सोबतच वडिलांसोबतचा बालपणीचा एक फोटो देखील तिनं शेअर केला. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. अंडरटेकर बनून ‘या’ अभिनेत्यानं केली होती अक्षय कुमारसोबत फाईट

जाहिरात

आलियामुळं करण जोहर झाला पिता? पितृदिनाच्या शुभेच्छा देत व्यक्त केल्या भावना सुशांतनं 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूला आज एक वर्ष उलटून गेलं आहे. मात्र मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे प्रकरण दिवसेंदिवस आणखीनच गुंतत चाललं आहे. आधी मुंबई पोलीस, मग इन्कम टॅक्स, पुढे सीबीआय आणि आता NCB द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही संशयीत आरोपी आहे. तिनं आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुशांतला ड्रग्स देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. शिवाय ड्रग्ज प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिची चौकशी सुरु आहे. या चौकशीत तिनं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं घेतली. सध्या तिनं केलेल्या दाव्यांची उलट तपासणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात