अभिनेत्री रिया चक्रवर्ती सतत चर्चेत असते. सध्या ती तिच्या आयुष्याची पुन्हा एकदा सुरूवात करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही ती सक्रिय पाहायला मिळत आहे. पण तिला नेटीझन्सच्या रोषला सामोरं जाव लागत आहे.
दरम्याने रियाने तिच्या सोशल मीडियावर नुकताच एक योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकंनी तिला नावं ठेवली तर काहींनी तिचं कौतुकही केलं.
गेल्या मागील वर्षापासून रिया सतत चर्चेत आहे. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर तिच्यावर नेटीझन्सनी मोठी टिका केली होती.
डिझायरेबल वुमन बनल्यानंतर रियाला काही चित्रपटांच्या ऑफर्स ही येऊ लागल्या होत्या. ज्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं होतं.