मुंबई, 1 मार्च- प्रसिद्ध कोरियोग्राफर (choreographer) रेमो डिसूझा (Remo D’souza) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत पत्नी लिझेल डिसूझासोबत मजेशीर व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. यावेळी देखील त्याने असाच एक व्हिडिओ शेअर (Instagram Video) केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या पत्नीला प्रेमाने सांगत आहे की ती त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ रेमोने आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी बनवला होता. तसेच, रेमोने यामध्ये आपल्याला सावळ्या रंगामुळे भेदभावाचा कसा सामना करावा लागला हेसुद्धा उघड केले आहे. व्हिडिओमध्ये, रेमो मोहम्मद रफी यांच्या ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है’ या गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेते मेहमूद आहेत. रेमो म्हणतो, ‘लोक जेव्हा त्याला ‘कालिया’ किंवा ‘काळू’ म्हणत तेव्हा तो चिडायचा. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याला वाईट वाटायचे तेव्हा तेव्हा त्याची आई त्याच्यासाठी हे गाणे गायची. आणि कालांतराने हे गाणं त्याच्या आवडत्या गाण्यांपैकी एक बनले. पत्नी लिझेलवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तो आता हे गाणं गात आहे.
व्हिडीओ शेअर करत रेमोने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे, ‘जेव्हा लोक मला कालिया किंवा काळू म्हणायचे तेव्हा मला लोकांचा तिरस्कार वाटायचा. परंतु तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की रंगाने काही फरक पडत नाही. हृदय महत्त्वाचे आहे. आणि ती त्यावेळी हे गाणे गात असे. तेव्हापासून हे माझे आवडते गाणे आहे. आता मी हे गाणे लिझेलसाठी गात आहे’. (हे वाचा: सुशांतच्या मृत्यूनंतरचा काळ आमच्या नात्यासाठी होता कठीण’, अंकिता-विकीचा खुलासा ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, रेमो डिसूझा ‘डीआयडी लिटिल मास्टर्स सीझन 5’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये 11 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. सोनाली बेंद्रे आणि मौनी रॉयसोबत तो या शो चं परीक्षण करणार आहे. लोकप्रिय अभिनेता जय भानुशाली हा शो होस्ट करणार आहे. डान्स रिअॅलिटी शोमध्ये 3 ते 13 वयोगटातील स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करतील. ‘डीआयडी लिटिल मास्टर्स सीझन 5’ झी टीव्हीवर १२ मार्चपासून दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता दाखवला जाईल.