छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) याने लोकांना आतापर्यंत खूप हसवलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आपला शो ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma Show) माध्यमातून चाहत्याचं मनोरंजन करीत आहे. मात्र नुकताच त्याचा शो बंद झाला आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. फोटो साभारः Instagram @kapilsharma)
मिळालेल्या माहितीनुसार संध्या कपिल मुंबईतील त्याच्या आलिशान घरात राहत आहे. तसं पाहता सिनेक्षेत्रात अनेक विनोदी कलाकार आले आणि गेले पण कपिल शर्माची प्रसिद्धी सर्वाधिक राहिली आहे. आज कपिल शर्मा एक रॉयल आयुष्य जगत आहे. (फोटो साभारः Instagram @kapilsharma)
हे सर्व फोटो कपिलच्या सुंदर घराचे आहेत. येथे तो आपल्या कुटुंबातसोबत राहतो. (फोटो साभारः Instagram @kapilsharma)
मुंबईतील ज्या फ्लॅटमध्ये कपिल आपल्या कुटुंबासोबत राहतो, तो भव्य असून घरभर हिरवळ पाहायला मिळते. (फोटो साभारः Instagram @kapilsharma)
कपिल शर्मा त्याच्या शोमुळे केवळ भारतातच नाही परदेशातही पसंत केला जातो. चाहते त्याचा शो लाइव्ह पाहण्यासाठी लांबून लांबून येतात. (फोटो साभारः Instagram @kapilsharma)
अनेकदा कपिल शर्मा शो मध्ये वाद झाले, मात्र कपिल आपल्या मेहनतीने कार्यक्रम सुरू ठेवत होता. फोटो साभारः Instagram @kapilsharma)
कपिल शर्मा जेव्हा स्टेजवर येतो, तेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलतं. कार्यक्रमात कीकू शरदा, कृष्णा अभिषेक, सुमोना चटर्जी आणि चंदन त्याला चांगली साथ देतात. (फोटो साभारः Instagram @kapilsharma)
कपिल आपल्या इन्स्टाग्रामवर बराच सक्रीय असतो. तो चाहत्यांसोबत आपल्या कुटुंबातील फोटो शेअर करीत असतो. कपिल शर्माला इन्स्टाग्रामवर 29 मिलियन लोक फॉलो करतात. (फोटो साभारः Instagram @kapilsharma)