• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ

‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ

‘विवाहित पुरुषावर प्रेम करणं काय असतं मला विचारा’; रेखा यांच्या उत्तरानं तुम्ही देखील व्हाल थक्क

 • Share this:
  मुंबई 4 एप्रिल: रेखा (Rekha) या बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. ‘उमराव जान’, ‘सिलसिला’, ‘कोई मिल गया’, ‘जुदाई’ (‘Umrao Jaan’, ‘Silsila’, ‘Koi Mil Gaya’, ‘Judai’) यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या रेखा गेल्या काही काळात सिनेसृष्टीपासून दूर आहेत. मात्र अलिकडेच त्यांनी इंडियन आयडल 12 (Indian idol season 12) या संगीत शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमधील स्पर्धकांनी जबरदस्त गाणी गाऊन चारचांद लावले. मात्र या भागाचं खरं आकर्षण ठरलं ते रेखा यांनी दिलेलं अनोखं उत्तर. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. सोनी वाहिनीनं या भागाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रेखा यांनी दिलेलं उत्तर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “तुम्ही एखादी अशी महिला पाहिली आहे जी एका पुरुषांच्या प्रचंड प्रेमात आहे तेही विवाहित पुरुषाच्या?” असा प्रश्न शोच्या होस्टनं रेखा यांना विचारला. यावर क्षणाचाही विलंब न करता ‘मला विचारा ना’ असं उत्तर त्यांनी दिलं.  “यावर होस्टनं काय म्हणालात?” असा प्रश्न त्यांना विचारला. मात्र त्यांनी “काहीच नाही” असं मिष्किल उत्तर देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला. फिट राहण्यासाठी मलायकानं दिल्या खास टीप्स; तुम्ही देखील करु शकता ट्राय
  रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. परंतु जया बच्चन यांच्यामुळं त्याचं नातं तुटलं असं म्हटलं जातं. अर्थात याबाबत रेखा किंवा बिग बी यांनी कधीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
  Published by:Mandar Gurav
  First published: