जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मुंबईत खूप गर्मी…' रील स्टार करण सोनवणेनं घेतली राज ठाकरेंची ग्रेट भेट

'मुंबईत खूप गर्मी…' रील स्टार करण सोनवणेनं घेतली राज ठाकरेंची ग्रेट भेट

'मुंबईत खूप गर्मी…' रील स्टार करण सोनवणेनं घेतली राज ठाकरेंची ग्रेट भेट

काही दिवसांपूर्वी मराठीतील सुप्रसिद्ध कन्टेन्ट क्रियेटर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यात रील स्टार करण सोनावणे सुद्धा सहभागी होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6 मार्च- काही दिवसांपूर्वी मराठीतील सुप्रसिद्ध कन्टेन्ट क्रियेटर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यात रील स्टार करण सोनावणे सुद्धा सहभागी होता. करण त्याच्या आईबाबांसोबत लंडनला फिरायला गेला होता. पण राज ठाकरे यांनी स्वतःहून आमंत्रण दिलंय म्हटल्यावर करण लंडनहून थेट शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या घरी पोहोचला. सोशल मीडिया पोस्ट करत करणनं राज ठाकरे यांच्या भेटीचा अनुभव सांगितला आहे. शिवाय या भेटीचे फोटो देखील शेअर केले आहेत. करण सोनावणेने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, ग्रेट भेट विथ द ग्रेट व्यक्ति👏🏼👏🏼👏🏼 “मी त्यांना सांगितलं कि मी लंडनहून मुंबईत उतरलो आणि थेट तुम्हाला भेटायला आलो.तेव्हा राज ठाकरे म्हणाले, “ मुंबईत खूप गर्मी आहे… तुझ्या हाताचा जरा स्पर्श घेतो म्हणजे ठंड वाटेल” (It’s hot in Mumbai. Let me touch your hand so I can feel the cold) वाचा- ‘आता परत येऊ नकोस…’ अरुंधतीच्या लग्नाच्या मुहूर्तावर अनिरुद्ध बरळलाच राज ठाकरे तुमचा टायमिंग कधीच चुकत नाय ! तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं…आपलं वाटलं ! कधीतरी तुमची निवांत मुलाखत घ्यायला मला खूप आवडेल… GENz च्या भाषेत PODCAST” असा भन्नाट अनुभव करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जाहिरात

करणने राज ठाकरे यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत राज ठाकरे करणला हात मिळवताना हसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत दोघेही कॅमेरा समोर पोझ देत आहेत. करणच्या चाहत्यांनी या भेटीचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यां च्या घरी करण सोनावणे सोबतच सिद्धांत सरफरे, नील सालेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, श्रवण शिरसागर, शंतनु रांगणेकर, नीलराज कदम, निखिल धाडवे, तेजस गायकवाड, धनंजय पवार, मनमीत पेम आणि अंकिता वालावलकर उपस्थित होते. या सगळ्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत गप्पा मारल्या. यावेळी अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या.

News18लोकमत
News18लोकमत

कंन्टेंट क्रिएटर अंकिता वालावलकरनं मनसेसाठी घातलं होतं खास गाऱ्हाणं राज ठाकरे यांच्या भेटी वेळचा अंकिता वालावलकरचा एक व्हिडिओ समोर आला होता. अंकिताने मनसेसाठी राज ठाकरेंसमोरच मालवणी गाऱ्हाणं घातलं होतं. “आज या ठिकाणी आम्ही सगळे जण जमलेलो असा…ते सगळेजण तुला गाऱ्हाणं घालतो ते मान्य करुन घे रे महाराजा…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो व्याप उत्तरोत्तर वाढत जाऊं दे रे महाराजा… मनसेच्या इरोधात जर कुणी काय केला असात वाकडानाकडा…तर त्याचो डाव त्याचारचं उलटां दे रे महाराजा… होय महाराजा ! बारामताचं गणित एक कर, वडाची साल पिंपळात कर…हिकडचं आमदार हिकडचं ऱ्हवांदे , पण तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा”, असं गाऱ्हाणं अंकिताने घातलं आहे. हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात