जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कंन्टेंट क्रिएटर अंकिता वालावलकरनं मनसेसाठी घातलं खास गाऱ्हाणं, Video घालतोय धुमाकूळ

कंन्टेंट क्रिएटर अंकिता वालावलकरनं मनसेसाठी घातलं खास गाऱ्हाणं, Video घालतोय धुमाकूळ

कंन्टेंट क्रिएटर अंकिता वालावलकरनं मनसेसाठी घातलं खास गाऱ्हाणं, Video घालतोय धुमाकूळ

कतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सची भेट घेतली. यावेळी अंकिता वालावलकरबरोबर नील, सिद्धांत सरफरे, निखिल धावडे यांसह इतरही क्रिएटर्सने हजेरी लावली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 2 मार्च- सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर अंकिता वालावलकर तिच्या भन्नाट व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत असते. नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सची भेट घेतली. यावेळी अंकिता वालावलकरबरोबर नील, सिद्धांत सरफरे, निखिल धावडे यांसह इतरही क्रिएटर्सने हजेरी लावली होती. राज ठाकरेंच्या कंटेन्ट क्रिएटर्सच्या भेटीवेळी शर्मिला ठाकरे व मनसे नेते अमेय खोपकरही उपस्थित होते. मनसेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दल माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या भेटी वेळचा अंकिता वालावलकरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अंकिताने मनसेसाठी राज ठाकरेंसमोरच मालवणी गाऱ्हाणं घातलं आहे. “आज या ठिकाणी आम्ही सगळे जण जमलेलो असा…ते सगळेजण तुला गाऱ्हाणं घालतो ते मान्य करुन घे रे महाराजा…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो व्याप उत्तरोत्तर वाढत जाऊं दे रे महाराजा… मनसेच्या इरोधात जर कुणी काय केला असात वाकडानाकडा…तर त्याचो डाव त्याचारचं उलटां दे रे महाराजा… होय महाराजा ! बारामताचं गणित एक कर, वडाची साल पिंपळात कर…हिकडचं आमदार हिकडचं ऱ्हवांदे , पण तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा”, असं गाऱ्हाणं अंकिताने घातलं आहे. सध्या हा भन्नाट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील हा व्हिडिओ चांगलाच उचलून घेत त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.

जाहिरात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अंकिताचा मालवणी गाऱ्हाणं गातानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अंकिताने मालवणी गाऱ्हाणं घातल्यानंतर उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच हसू आल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अंकिता वालावलकर ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने ती प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. सोशल स्टार म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या अंकिताने नुकतीच चला हवा येऊ द्या या शोमध्येही हजेरी लावली होती. सोशल मीडिया तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात