Home /News /entertainment /

VIDEO: देशातील पहिला समलैंगिक संबंधावर आधारित चित्रपट रिलीजसाठी सज्ज, सिनेमात दिसणार हॉटनेसचा तडका

VIDEO: देशातील पहिला समलैंगिक संबंधावर आधारित चित्रपट रिलीजसाठी सज्ज, सिनेमात दिसणार हॉटनेसचा तडका

सेन्सॉर बोर्डच्या मंजुरीनंतर 'डेंजरस : खतरा' (Dangerous: Khatra) हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. डेंजरस: खतरा भारतातील पहिल्या लेस्बियन प्रेमकथेवर (first lesbian film) बनलेला चित्रपट आहे.

    मुंबई, 26 फेब्रुवारी-   सेन्सॉर बोर्डच्या मंजुरीनंतर 'डेंजरस : खतरा'   (Dangerous: Khatra)   हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. डेंजरस: खतरा भारतातील पहिल्या लेस्बियन प्रेमकथेवर  (first lesbian film)  बनलेला सर्वात वादग्रस्त चित्रपट अखेर 8 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा   (Ram Gopal Varma)  यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचा बोल्ड विषय आणि लेस्बियन प्रेमकथेसाठी सेन्सॉर बोर्डकडून मंजुरी मिळण्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती. नुकतंच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने 'ए' प्रमाणपत्र दिले आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमीच निरनिराळे विषय आपल्या चित्रपटातून मांडत असतात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची जोरदार चर्चा होत असते. या चित्रपटाच्या बाबतीतसुद्ध असंच काहीसं झालं आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत रिलीजची तारीख सांगितली आहे. शिवाय आनंदसुद्दा व्यक्त केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणाले होते की, "'डेंजरस: खतरा'ला सेन्सॉरने मंजुरी दिल्यानंतर आम्हाला फारशी अपेक्षा नव्हती. कारण ही दोन महिलांमधील प्रेमकथा आहे. परंतु कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंध कायदेशीर आहे. 'डेंजरस: खतरा' हा पहिला भारतीय समलिंगी चित्रपट आहे, ज्याला A प्रमाणपत्र मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. जर त्याला A प्रमाणपत्र मिळाले नसते तर मी खूप निराश झालो असतो'. चित्रपटाची कथा दोन महिलांमधील प्रेम आणि त्यांच्या समलैंगिक संबंधांवर आधारित आहे. या पुरुषप्रधान समाजात असंतुष्ट असलेले लोक एकमेकांकडे आकर्षित होतात. या क्राईम थ्रिलर-ड्रामा चित्रपटात अतिशय बोल्ड आणि इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले आहेत. या चित्रपटात साऊथ चित्रपटातील हॉट सायरन्स अभिनेत्री अप्सरा राणी आणि नयना गांगुली मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 8 एप्रिल रोजी हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हे वाचा:एकता कपूरच्या 'बेकाबू' वेब सीरीजमधील Hot & Bold प्रिया बॅनर्जी आहे तरी कोण? ) जगातील अनेक देशांप्रमाणे भारतातही १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत समलैंगिकता गुन्हेगारीच्या श्रेणीत येत होती. त्यामुळे समलिंगी व्यक्तींना सामाजिकरित्या बाहेर येण्यात अडचण तर होतीच, शिवाय कायद्याच्या नजरेत ते गुन्हेगार होते. परंतु सप्टेंबर 2018 मध्ये कलम 377 हटवण्याचा निर्णय हा एक निर्णय होता ज्याने देशभरातील लाखो LGBTQIA+ लोकांचे जीवन बदलले. याचा अर्थ त्यांना शेवटी घटनात्मक समानता देण्यात आली.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Lesbian girls, Upcoming movie

    पुढील बातम्या