मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Timepass 3 बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ; 400 स्क्रिन्स अन् 10,000 शोजसह सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज

Timepass 3 बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ; 400 स्क्रिन्स अन् 10,000 शोजसह सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज

टाईमपास चा सिक्वल पाहण्यासाठी प्रेक्षक अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होते.  याविषयी आता दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. पाहा POST

टाईमपास चा सिक्वल पाहण्यासाठी प्रेक्षक अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होते. याविषयी आता दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. पाहा POST

टाईमपास चा सिक्वल पाहण्यासाठी प्रेक्षक अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होते. याविषयी आता दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. पाहा POST

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 28 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून मराठीतील एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यामधील गाणी, डायलॉग सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेले पहायला मिळत आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता प्रथमेश परब अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट म्हणजे 'टाईमपास 3' (Timepass 3). 'टाईमपास 3' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टाईमपास चा सिक्वल पाहण्यासाठी प्रेक्षक अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याविषयी आता दिग्दर्शक रवी जाधव यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. बहुप्रतिक्षित 'टाईमपास 3' चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाचा एक पोस्टर शेअर करत रवी जाधव यांनी लिहिलं की, 'मराठीतल्या ब्लॉकबस्टरची मोठ्या पडद्यावर होणार जबराट एन्ट्री! 400 स्क्रिन्स आणि 10,000 शोजसह  'टाईमपास 3' 29 जुलैपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. दगडूचा लवचा लोचा पाहण्यासाठी बुक माय शोवरुन आताच ऍडव्हान्स तिकीट बुक करा'. रवी जाधवची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी हा चित्रपट काय जादू दाखवणार हे पाहणंही औचित्याचं ठरणार आहे. हेही वाचा -  'कुछ कुछ होता है' च्या त्या सर्वाधिक memes होणाऱ्या सीनबद्दल अनुपम खेर यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट रवी जाधवच्या या पोस्टवरुन पहायला मिळतंय की, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बुकींग सुरु झालं असून प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकही हा चित्रपट पाहण्यासाठी चागंलेच उत्सुक असलेले दिसतायेत. मात्र हा चित्रपट पहिल्या दोन भागांपेक्षा खरंच जबराट ठरणार का?, प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, या चित्रपटातील हृता म्हणजेच पालवी हटके कुल अंदाजात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. हृता पहिल्यांदाच अश्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिच्या भूमिकेसाठी चाहते अधिक उत्सुक आहेत. याशिवाय प्रथमेश म्हणजेच दगडूला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेलं आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागातपल्लवीसोबतची त्याची केमेस्ट्री पहायला मजा येणार आहे.
First published:

Tags: Entertainment, Instagram post, Marathi actress, Marathi cinema, Prathmesh Parab, Ravi Jadhav

पुढील बातम्या