अखेरच्या क्षणी सलमान खानच्या लग्नात आली अडचण आणि...

अखेरच्या क्षणी सलमान खानच्या लग्नात आली अडचण आणि...

सलमान खान आज त्याचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : सलमान खान उद्या त्याचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. मागच्या बऱ्याच वर्षांपासून  त्याच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. आतापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. पण कोणत्याही मुलाखतीत किंवा फंक्शनमध्ये लग्नाबद्दल विचारलं तर सलमान हा विषय नेहमीच टाळताना दिसतो. त्यामुळे सलमानच्या लग्नाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे. सलमान अजूनही लग्न का करत नाही हे चाहत्यांसाठी न उलगडलेलं कोडंच आहे. पण आता प्रोड्युसर साजिद नाडियावालानं सलमानच्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी हाऊसफुल 4 सिनेमाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचलेल्या साजिदनं सलमानच्या लग्नाविषयी सांगितलं, सलमान आणि मी एकाच दिवशी लग्न करणार होतो. त्याच्याकडे मुलगी होती. मला शोधावी लागली. दोघांच्याही लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या. मात्र अचानक काही असं घडलं ज्यामुळे त्याचं लग्न मोडलं. नंतर माझ्या लग्नाच्या वेळी तो स्टेजवर आला आणि म्हणाला, मागे गाडी उभी आहे पळ लवकर. पण मी असं करु शकलो नाही.

सजिदनं अगोदर दिव्या भारतीशी लग्न केलं होतं. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर दिव्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला. त्यानंतर 2000 मध्ये साजिदनं वर्धा खानशी लग्न केलं. वर्धा पत्रकार होती आणि ती दिव्या भारतीच्या मृत्यूवर स्टोरी करत होती. दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि नंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं.

Published by: Megha Jethe
First published: December 26, 2019, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading