मुंबई, 26 मार्च- 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री होत्या ज्यांची जादू आजही कायम आहे. या अभिनेत्रींनीं सौंदर्य आणि आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर नव्वदचा काळ गाजवला होता. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रविना टंडन होय. रविना टंडन अभिनयामुळे तर चर्चेत होतीच शिवाय ती आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत होती. अभिनेत्रीने विवाहित व्यक्तीसोबत लग्न करत सर्वांनाच चकित केलं होतं. या लग्नानंतर अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्यात बराच वादही झाला होता. आज आपण त्यातीलच एक किस्सा पाहणार आहोत.
बॉलिवूडमध्ये सतत सेलिब्रेटींच्या ब्रेकअप आणि लिंकअपच्या बातम्यासमोर येत असतात. आताच नव्हे तर हे अनेक वर्षांपासून चालत आलं आहे. 90 च्या दशकातसुद्धा अशा अनेक जोड्या चर्चेत होत्या. रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या नात्याबद्दल जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. 90 च्या दशकात दोघेही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित जोडप्यांपैकी एक होते. दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं. पण अक्षय कुमारच्या एका चुकीने दोघे विभक्त झाले होते. खऱ्या आयुष्यात ब्रेकअप झाल्यानंतर दोघांची ऑनस्क्रीन जोडीही परत पाहायला मिळाली नाही. अक्षयसोबत ब्रेकअपनंतर रवीनाने स्वतःला लाइम लाईटपासून पूर्णपणे दूर ठेवलं होतं. याकाळात तिने दोन मुली दत्तकघेत त्यांचं संगोपन केलं. शिवाय निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवत, नव्या इनिंगला सुरुवात केली होती.
निर्मिती क्षेत्रात आल्यानंतर रविनाची ओळख अनिल थडानी यांच्यासोबत झाली होती. अनिल डिस्ट्रिब्युशनचं काम सांभाळत होते. दरम्यान रवीना टंडन आणि अनिल थडानी यांची कामा संदर्भात सतत भेट होत असे. पण अनिल रविनाला भेटण्यापूर्वीच विवाहित होते. त्याकाळात त्यांचा पत्नी नताशा सिप्पीसोबत वाद सुरु होता. अशा परिस्थिती अनिलची रवीनाशी जवळीकता वाढतच गेली. दरम्यान, अनिलने पत्नी नताशा सिप्पीसोबत घटस्फोटही घेतला.नताशा चित्रपट निर्माते रोम्यू सिप्पी यांची मुलगी होती.
नताशासोबत विभक्त झाल्यांनंतर अनिल यांनी रविनाला आयुष्याची जोडीदार म्हणून पाहायला सुरुवात केली. पुढे रवीना टंडन आणि अनिल थडानी यांनी नोव्हेंबर 2003 मध्ये साखरपुडा उरकला. आणि फेब्रुवारी 2004 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनंतर दोघेही आपल्या संसारात रममाण झाले होते. अशातच एके दिवशी एका पार्टीत रवीना टंडन आणि अनिल थडानीची एक्स-पत्नी नताशा यांच्यात जोरदार भांडण झालं. यावेळी अनिल रवीनासोबत रितेश सिधवानी यांच्या न्यू इयर पार्टीत पोहोचला होता. तर दुसरीकडे नताशा तिच्या मैत्रिणींसोबत तिथे पोहोचली होती. या दोघींच्या भांडणाची आजही तितकीच चर्चा होते.
पार्टीत नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं की, नताशा सिप्पी अनिल थडानीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. रवीनाने ते पाहिल्यानंतर रागात तिने ज्यूसने भरलेला ग्लास नताशाच्या दिशेने फेकला. यावर बोलताना नताशाने एकदा सांगितलं होतं की, रवीनाने ग्लास फेकून मारल्यानंतर आपल्या हातातून रक्त येत होतं. नताशा पुढे म्हणाली की, रवीनामुळे अनिल तिच्यापासून विभक्त झाला आहे. या भांडणानंतर रवीना टंडनने मीडियाला मुलाखत देत आपल्याला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप नसल्याचं म्हटलं होतं. माझ्या पतीसोबत कोणी चुकीचं वागायचा प्रयत्न केला तर मी हेच करणार असंही ती म्हणाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment