Smriti Irani: गर्भपाताच्या दुसऱ्याच दिवशी शूटिंगवर बोलावलं,स्मृती ईरानींनी उघड केलं मालिका विश्वातील भयाण वास्तव
Smriti Irani On Acting Career:स्मृती ईरानी राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. मालिकेतून तुलसीच्या रुपात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली होती.
केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांची एक मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या अभिनय करिअरमधील एक धक्कादायक खुलासा करत सर्वांनाच चकित केलं आहे.
2/ 10
स्मृती ईरानी राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. मालिकेतून तुलसीच्या रुपात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली होती.
3/ 10
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, याच मालिके संदर्भात त्यांनी हा खुलासा करत सर्वांनाच थक्क केलं आहे.
4/ 10
या रिपोर्ट्सनुसार, स्मृती यांनी सांगितलं की, या मालिकेदरम्यान त्यांचा गर्भपात झाला होता.परंतु यासाठी त्यांना निर्मात्यांना गर्भपात झालेला रिपोर्ट दाखवावा लागला होता. कारण त्यांच्या सह कलाकारांनी गर्भपात झाल्याची गोष्ट खोटी असल्याचं सांगत एकताला फितवलं होतं.
5/ 10
स्मृती यांनी पुढे सांगितलं, मी एका वेळी रामायण आणि क्योंकी सास भी कभी बहू थी या दोन्ही मालिका करत होते. यासाठी दोन शिफ्ट कराव्या लागत असत.
6/ 10
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 'या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्या गर्भवती होत्या. परंतु त्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. परंतु शूटिंगमध्ये त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी सुट्टी देण्याची विनंती केली.
7/ 10
परंतु तरीही त्यांना घरी जाण्याची परवानगी देईपर्यंत आपण काम केल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हा आपण सेटवरुन निघालो तेव्हा रात्र झालेली. रुग्णलयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला.
8/ 10
अशातच घरी जात असताना रस्त्यात मध्येच रक्तस्त्राव व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी मुसळधार पाऊसही होता. मी रिक्षावाल्याला रुग्णलयात जायला सांगितलं.
9/ 10
रुग्णालयात जाताच नर्सने माझ्याकडे ऑटोग्राफ मागितलं. मी मला ऍडमिट करुन घ्यायला सांगितलं. त्यावेळी माझा गर्भपात झाला होता.
10/ 10
दरम्यान मला सेटवरुन फोन आला त्यांनी मला लगेचच दुसऱ्या दिवशी शुटिंगवर बोलावलं होतं. मी त्यांना गर्भपात झाल्याचं सांगितलं,तर तिकडून उत्तर आलं, काही हरकत नाही २ वाजताची शिफ्ट आहे, या तुम्ही. या खुलाशाने सर्वच चकित झाले आहेत.