Home /News /entertainment /

‘तिच्यामुळं माझं आयुष्य बदललं’; शेवंतानं ‘या’ स्त्रीला दिलं आपल्या यशाचं श्रेय

‘तिच्यामुळं माझं आयुष्य बदललं’; शेवंतानं ‘या’ स्त्रीला दिलं आपल्या यशाचं श्रेय

एखाद्या नामांकित कालाकाराला लाजवेल इतकं फॅन फॉलोइंग आहे. थोडक्यात काय तर ती आज यशाच्या शिखरावर आहे. या अभूतपुर्व यशाचं श्रेय तिनं एका स्त्रीला दिलं आहे.

  मुंबई 9 एप्रिल: अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chale 3) या मालिकेमध्ये शेवंता (Shevanta) ही व्यक्तिरेखा साकारुन रातोरात ती प्रकाशझोतात आली. आज तिच्याकडे एखाद्या नामांकित कालाकाराला लाजवेल इतकं फॅन फॉलोइंग आहे. थोडक्यात काय तर ती आज यशाच्या शिखरावर आहे. या अभूतपुर्व यशाचं श्रेय तिनं एका स्त्रीला दिलं आहे. या स्त्रीमुळं अपूर्वाचं आयुष्य रातोरात बदललं. अपूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन तिच्या आयुष्यातील या स्त्रीचं नाव सांगितलं आहे. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द शेवंताच आहे. होय, याच स्त्री व्यक्तिरेखेमुळंच तिचं आयुष्य बदललं. तिला रातोरात स्टार केलं. अन् यासाठी तिनं शेवंताचे आभार मानले आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अवश्य पाहा - होतोय अश्लीलतेचा प्रचार? टोनी कक्करच्या गाण्यांवर केली जातेय बंदीची मागणी
  रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तीसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच सगळ्या कलाकारांची अर्थात त्यांच्या पात्रांची एंट्री झाली होती. मात्र, प्रेक्षक वाट बघत होते ती त्यांच्या लाडक्या ‘शेवंता’ची! अखेर प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता आता या मालिकेत भुताच्या रूपाने का होईना पण अण्णांसोबत ‘शेवंता’ची (Shevanta) देखील एंट्री झाली आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Apurva nemlekar, Marathi actress, Ratris khel chale, Zee marathi serial

  पुढील बातम्या