मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ratan Rajput: टीव्ही-युट्युबवरुन गायब असण्यावर रतन राजपूतने सोडलं मौन; सांगितलं खरं कारण

Ratan Rajput: टीव्ही-युट्युबवरुन गायब असण्यावर रतन राजपूतने सोडलं मौन; सांगितलं खरं कारण

रतन राजपूत

रतन राजपूत

झी टीव्हीवरील 'अगले जनम मोहें बिटियाही कीजो' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रतन राजपूत घराघरात पोहोचली होती. या मालिकेत रतनने लाली ही भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 7 जानेवारी- झी टीव्हीवरील 'अगले जनम मोहें बिटियाही कीजो' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रतन राजपूत घराघरात पोहोचली होती. या मालिकेत रतनने लाली ही भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मालिकेतील रतनची भूमिका आणि तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडला होता. मुख्य अभिनेत्री म्हणून आपल्या या पहिल्याच मालिकेत रतनचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. या मालिकेमुळे रतनला देशातील घराघरात ओळख मिळाली होती. मात्र सध्या रतन राजपूत छोट्या पडद्यावरून गायब आहे. ती कोणत्याही मालिकेत काम करताना दिसून येत नाहीय. त्यामुळे तिचे चाहते तिच्याबाबत जाणून घ्यायला उत्सुक आहेत.

गेल्या काही वर्षांपासून रतन राजपूत मालिकांमधून ब्रेक घेत आपल्या मूळ गावी परतली आहे. द्या अभिनेत्री तिथेच वास्तव्य करत आहे. मालिकांमधून गायब झाल्यानंतर रतन राजपूतने आपलं स्वतःच एक युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून रतन राजपूत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. युट्युबवर ती आपले आपलं आयुष्य सध्या कसं आहे, आपण काय करत आहोत याच्या अपडेट्स देत असते. यामध्ये कधी ती आपल्या नातेवाईकांसोबत दिसून येते तर कधी आपल्या शेतात काम करताना दिसून येते. रतनचा हा साधेपणा तिच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे.

(हे वाचा:Tunisha Sharma: तुनिषा शर्मानंतर 'ही' अभिनेत्री बनणार नवी 'मरियम'? समोर आलं नाव )

मात्र सध्या रतन राजपूत आपल्या युट्युब चॅनेलवरुनसुद्धा गायब आहे. अनेक दिवसापासून रतनने कोणताही व्हिडीओ अपलोड केलेला नाहीय. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. रतन पडद्यापासून का दूर आहे किंवा युट्युब चॅनेलवरुन का गायब आहे हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आता रतनने आपल्या युट्युब चॅनेलवर वापसी केली आहे. अभिनेत्रीने अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर आपला नवा वलॊग अपलोड केला आहे. याच व्हिडीओच्या माध्यमातून रतनने आपण इतके दिवस कुठे गायब होतो याचा खुलासा केला आहे.

रतन राजपूतने नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात युट्युबवर वापसी करत आपल्या चाहत्यांना खुश केलं आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. या व्हिडीओमध्ये रतन म्हणत आहे, 'मला माहितेय की, अचानकच मधून गायब होते. परंतु मी काय करू माझं आयुष्यच असं आहे. अभिनेत्रीने पुढे सांगितलं की, मी इतके दिवस माझ्या घरी राहात होते. परंतु सध्या मी माझ्या मामाच्या घरी राहात आहे. अभिनेत्रीने म्हटलं की, गेल्या तीन वर्षांपासून ती सायकोलॉजीचा अभ्यास करत आहे. अभिनेत्रीला वाटतं की, माणसाच्या आतील इतर गोष्टींना समजून घेता आलं तर, त्यासाठी तिने एका महिन्याचा न्यूरोथेरेपीचा कोर्ससुद्धा केला आहे'.

'रतनने पुढे सांगितलं की, 'ती कोणत्याही सर्टिफिकेटसाठी किंवा डिग्रीसाठी हा अभ्यास करत नाहीय. तर तिला या गोष्टींची आवड आहे. तिला हा विषय जाणून घेण्यात रस आहे. आणि विशेष म्हणजे तिचे मामाच तिला याची माहिती देत आहेत. अभिनेत्रीने सांगितलं अजून चार दिवस मला हा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर मी यामधून मोकळी होते. म्हणजे मला परत माझ्या चाहत्यांसोबत वलॊगच्या माध्यमातून धम्माल करता येणार आहे.

जेव्हा अभिनेत्रीला विचारलं जातं तू काम का नाही करत, तुझं वय वाढत आहे. नंतर तुला भूमिका नाही मिळणार. यावर रतनने म्हटलंय, 'मी मुंबईत आले तेव्हा सुरुवातीला रस्त्यावर राहून आणि मिळेल ते खाऊन आयुष्य काढलं आहे. त्यामुळे मला या गोष्टींची भीती नाही'.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Lokmat news 18, Tv actress