मुंबई, 02 ऑक्टोबर : मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil ) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रसिका सुनील म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया. अजूनही ती शनाया म्हणूनच ओळखली जाते. हीच शनाया आता खऱ्या आयुष्यात संसार थाटायला जाते आहे. सोशल मीडियावर तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
रसिका बॉयफ्रेंड आदित्य बिलागी (Aditya Bilagi) याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. रसिकाने तिचे आदित्य बिलागी याच्याशी असणारे नाते कधीच लपवून ठेवलेले नाही. रसिकाने आदित्य बिलागीला डेट करत असल्याची माहिती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती आणि आता आदित्य बिलागी याच्यासोबत संसार थाटणार म्हणजे (Rasika sunil married soon) लग्न करणार असल्याची बातमी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
View this post on Instagram
रसिका आणि आदित्य यांनी एकत्रितरित्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिचा लाडका कुत्रा रशदेखील दिसतो आहे. या तिघांनी हातात एक पाटी पकडली आहे. या पाटीवर “माझे ह्युमन फ्रेंड्स लग्न करत आहेत” असं लिहिण्यात आलं आहे.
हे वाचा - ‘तनहा तनहा’ गाण्यात उर्मिलाने या अभिनेत्याचे घातले होते बनियन; स्वत केला खुलासा
या फोटोच्या कॅप्शनमध्ये आदित्ये म्हटलं आहे, “जेव्हा रसिका रशला भेटण्यासाठी मला पहिल्यांदा घेऊन गेली तेव्हा तो म्हणाला की माझ्या वयात एका नजरेत कळते की मुलगा आणि मुलीमध्ये काय सुरू आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला रशची भविष्यवाणी सांगण्याचा विचार करत आहोत” असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तर पुढे आदित्यने “आय लव्ह यू सो मच रसिका हे अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही” असेही म्हटले आहे.
हे वाचा - Bigg Boss Marathi फेम सई लोकूर मालदीवमध्ये पतीसोबत झाली रोमँटिक; शेअर केले खास फोटो
आदित्य बिलागी हा मूळचा औरंगाबादचा आहे. परंतु गेल्या नऊ वर्षांपासून तो लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाला आहे. आदित्य हा इंजिनीअर तर आहेच. त्याशिवाय तो उत्कृष्ट डान्सर, गायक देखील आहे. आदित्यने त्वायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्टही मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी रसिका ही शिक्षणासाठी परदेशात गेली होती. तिथेच तिची भेट आदित्यसोबत झाली होती. रसिका आणि आदित्य यांची पहिली भेट 2018 मध्ये लॉस ऐंजिलीसमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर या दोघांनी 2020 मध्ये एकमेकांना भेटायला सुरुवात केली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. विशेष म्हणजे यांनी लग्न करणार असल्याचे सांगितले असले तरी कधी करणार आहे याची तारीख मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे. पण त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.