मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘पुष्पा-2’मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेला लागणार कात्री? 'हे' आहे कारण

‘पुष्पा-2’मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेला लागणार कात्री? 'हे' आहे कारण

‘पुष्पा-2’मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेला लागणार कात्री? 'हे' आहे कारण

‘पुष्पा-2’मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेला लागणार कात्री? 'हे' आहे कारण

प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या पुष्पा या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सिक्वेलमध्ये सर्वांची लाडकी श्रीवल्ली दिसणार नाहीये. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

    नवी दिल्ली, 20 जून : कधी अल्लड, खोडकर तर कधी साधी, सरळ गावातील तरुणी असलेल्या ‘श्रीवल्ली’ (Srivalli) या ‘पुष्पा-द राईज’ (Pushpa The Rise) चित्रपटातील पात्राने रातोरात चाहत्यांच्या मनात स्थान पटकावलं. हे पात्र साकारणारी रश्मिका मंधानालाही अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाचा आता दुसरा भाग येणार असून, ‘श्रीवल्ली’च्या चाहत्यांना निराश करणारी बातमी समोर येत आहे. कारण दुसऱ्या भागात या पात्राची भूमिका मर्यादित केली आहे. संपूर्ण चित्रपटात आता श्रीवल्ली सीन्समध्येच दिसेल. त्यामुळे रश्मिकाच्या रोलला कात्री लागणार का याबद्दल चर्चा सुरू आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबद्दल वृत्त दिलं आहे. दक्षिणेसह संपूर्ण देशभर ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रचंड गाजला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इतक्या दिवसांनंतरही या चित्रपटातील गाणी आणि संवादांवरून (Songs & Dialogue) सोशल मिडियावर एकाहून एक भन्नाट मीम्स तयार झाले व ते प्रचंड व्हायरलही होत आहेत. पुष्पाच्या भूमिकेत अल्लू अर्जून (Allu Arjun) आणि श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिकाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. दोघांच्या प्रेमाची केमेस्ट्री प्रत्येकाला भावली. चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही ती पाहण्यास मिळेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. परंतु, श्रीवल्लीच्या पात्राला दुसऱ्या भागात कमी सीन्स देण्यात आले असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. माध्यमांतील बातम्यांनुसार, दुसऱ्या भागात श्रीवल्ली काही सीन्समध्येचं दिसेल. चित्रपटाला आणखी मनोरंजक करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
    हेही वाचा - चुकीच्या रूट कॅनॉलनं लागली अभिनेत्रीच्या चेहऱ्याची वाट; आता ओळखणंही झालंय कठीण, पाहा PHOTO पुष्पा राज आता देशाबाहेर रक्तचंदनाची तस्करी ‘पुष्पा’ पात्राच्या भूमिकेतील अल्लू अर्जुनने त्यांच्या स्टाईलने सर्व चाहत्यांना घायाळ केलं आहे. पोलीस, वन विभाग आणि चंदन माफियांच्या हाती न लागता रक्तचंदनची तस्करी तो राज्यांच्या सीमेपार करताना दाखवला आहे. पुष्पा चित्रपटाच्या पुढच्या भागात तो आता रक्तचंदन थेट पूर्व आशियाई देशांत करताना दिसणार आहे. त्यामुळे हा भाग आणखीनच थरारक असेल, असा अंदाजही बांधला जात आहे. पुढील भागात श्रीवल्लीचा मृत्यू शक्य काही रिपोर्ट्नुसार, ‘पुष्पा 2’ मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू दाखवला जाऊ शकतो. पुढील भागात पोलिसांकडून श्रीवल्लीचा वापर एका प्याद्याप्रमाणे होऊ शकतो. चित्रपटाच्या कथेत काही वेगळं दाखवण्यासाठी रश्मिका ऊर्फ श्रीवल्लीचा मृत्यू दाखवला जाऊ शकतो. या चित्रपटाचा तिसरा भाग आणण्याची दिग्दर्शक सुकुमार यांची इच्छा नसल्याचंही बोललं जात आहे. त्याचमुळे श्रीवल्लीचा मृत्यू यात दाखवण्याची शक्यता आहे. तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. शिवाय अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या पात्रांनी चाहत्यांच्या मनात घर केलं. चित्रपटातील गाणी, डायलॉग तर आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही चित्रपट तितकाच मनोरंजक आणि चित्तथरारक असेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    First published:

    Tags: South actress, South film, South indian actor

    पुढील बातम्या