ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने इंडस्ट्रीत आपली एक खास ओळख बनवली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
जान्हवी कपूरने फारच कमी वेळेत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. 5 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
मराठीतील सुपरडुपर हिट चित्रपट 'सैराट'चा हिंदी रिमेक असणाऱ्या 'धडक' या चित्रपटातून जान्हवीने पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला पाच वर्षे उलटली आहेत.
या चित्रपटात जान्हवी एका राजस्थानी मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यामुळे या चित्रपटाचं बऱ्यापैकी शूटिंग राजवाडे,ऐतिहासिक मंदिरे अशा ठिकाणी झालं होतं.
तसेच या चित्रपटातील काही महत्वाच्या दृश्यांचं शुटींग राजस्थान येथील आमेरमधील जगत शिरोमणी या सुंदर अशा भव्यदिव्य मंदिरात झालं होतं.
तब्बल 5 वर्षानंतर जान्हवी या मंदिरात पोहोचली आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
जान्हवीने या मंदिरातील अनेक सुंदर फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याच ठिकाणी जान्हवीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
सध्या जान्हवी आपल्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने पोहोचली आहे. सध्या हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.