जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्रीने नॉनव्हेज खाल्लं अन् नेटकऱ्यांची सटकली! पाहा का ट्रोल होतेय रश्मिका मंदाना?

अभिनेत्रीने नॉनव्हेज खाल्लं अन् नेटकऱ्यांची सटकली! पाहा का ट्रोल होतेय रश्मिका मंदाना?

रश्मिका मंदाना होतेय ट्रोल

रश्मिका मंदाना होतेय ट्रोल

Rashmika Mandanna Troll: रश्मिका मंदाना हिने स्वतःला व्हेजिटेरियन असल्याचा दावा केला होता. मात्र आता,अभिनेत्रीचा चिकन बर्गर खाताना जाहिरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ट्रोलर्स तिच्यावर निशाणा साधत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 मे: अभिनेत्री रश्मिका मंदाना ही कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. रश्मिकाला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. सध्या अभिनेत्रीला तिच्या एका जाहिरात व्हिडिओमध्ये चिकन बर्गर खाल्ल्यामुळे ट्रोल केलं जातंय. अनेक सोशल मीडिया युजर्स रश्मिकाला खोटारडी म्हणत आहेत. कारण तिने व्हेरिटेरियन असल्याचा दावा केला होता.

नॉनव्हेज बर्गर खाल्ल्याने रश्मिका ट्रोल

एका व्हायरल व्हिडिओ जाहिरातीमध्ये, रश्मिका मंदाना एका प्रसिद्ध जंक फूड ब्रँडची जाहिरात करण्यासाठी चिकन बर्गर खाताना दिसतेय. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेत्रीने एकदा ती खऱ्या आयुष्यात व्हेजिटेरियन असल्याचा दावा केला होता. अशा वेळी तिचा चिकन बर्गर खाताना जाहिरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तिला लगेच ट्रोल करण्यात आले. एका ट्रोलने लिहिले की, ‘ते पैशासाठी काहीही करतात.’

News18लोकमत
News18लोकमत

काय म्हणताय ट्रोलर्स

नेटिझन्स रश्मिकाला ‘खोटारडी’ म्हणत आहेत. तर काही म्हणत आहेत की, पैशांसाठी सेलेब्सकाहीही करतात. मांसाहारी बर्गर खाल्ल्यामुळं ट्रोल होण्यासोबतच जंक फूड ब्रँडच्या प्रचारासाठीही रश्मिकाला ट्रोल केलं जातंय. रश्मिकाच्या चाहत्यांनी मात्र अभिनेत्रीचा बचाव केलाय. एकाने लिहिले, ‘भाई हे बंद करा, ती एक माणूस आहे. तिला काहीही खाण्याचे स्वातंत्र्य आहे. तिच्या पर्सनल गोष्टींमध्ये आपण बोलू नये.’

VIDEO : शिल्पा शेट्टीलाही मोह आवरला नाही, ‘बहरला हा मधुमास’ वर केला अप्रतिम डान्स

रश्मिका मंदाना वर्क फ्रंट

रश्मिका मंदानाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री अखेरच्या वेळी विजय-स्टार तामिळ चित्रपट ‘वारीसु’ मध्ये दिसली होती. तिच्याकडे संदीप रेड्डी वंगा यांचा अॅनिमल हा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या रश्मिका इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात