**मुंबई, 20 मे-**अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या लग्नाला काल ३५ वर्ष पूर्ण झाली. या यशस्वी नात्यात अनेक मजेशीर गोष्टी आहेत. हे किस्से सांगायचे झाले तर दिवसही अपुरा पडेल. अनेक आठवणींपैकी एक आठवण आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. अनिल कपूर यांनी एका रात्रीत सुनीता कपूर यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सुनीताला फोन करून सांगितलं की, ‘उद्या लग्न करूया…’ दुसऱ्या दिवशी फक्त १० लोकांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं. अनिल यांनी स्वतः आपल्या लग्नाचा अनुभव सांगताना म्हटलं की, ‘माझ्या एका मित्राने सुनीताला माझा नंबर देऊन प्रँक कॉल करायला सांगितला होता. ती पहिली वेळ होती जेव्हा आम्ही बोललो. तेव्हा मी तिचा आवाज ऐकूनच घायाळ झालो होतो. काही आठवड्यानंतर आम्ही एका पार्टीत भेटलो. तिथे पहिल्यांदा आम्ही एकमेकांशी बोललो होतो. तिच्यात असं काही होतं की ज्याने मी सुनिताकडे आकर्षित झालो. आमचं बोलणं सुरू झालं. आम्ही मित्र झालो.. तिला मी माझ्या ब्रेकअपबद्दलही सांगितलं. आम्ही एकमेकांना अप्रत्यक्षरित्या डेट करत होतो. त्यात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसारखं काही नव्हतं.’
यानंतर अनिल म्हणाले की, ‘माझे वडील बँकेत नोकरी करायचे तर सुनिता तेव्हा मॉडेलिंग करत होती. माझ्याकडे तेव्हा काही कामही नव्हतं. मी चेंबूरमध्ये राहायचो तर ती नेपियन्सी रोडवर राहायची. मी तिला भेटायलाही बसने जायचो. ती नेहमी बोलायची की टॅक्सीने लवकर ये.. यावर माझं उत्तरही ठरलेलं असायचं की माझ्याकडे पैसे नाहीत. यावर सुनिता म्हणायची की तू फक्त टॅक्सीने बाकी मी पाहते. अशा प्रकारे आम्ही १० वर्ष एकमेकांना डेट केलं. अनेक ठिकाणी एकत्र फिरलो.’ ‘जेव्हा माझा पहिला सिनेमा ‘मेरी जंग’ चालला तेव्हा मला वाटलं की मी घर घेऊ शकतो.. घरात सामान घेऊ शकतो आणि एक सहाय्यकही ठेवू शकतो. मी लग्न करू शकतो. मी सुनीताला फोन केला आणि म्हटलं की आपण उद्या लग्न करतोय. दुसऱ्या दिवशी १० जणांच्या उपस्थितीत आम्ही लग्न केलं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच मी शूटवर गेलो आणि सुनीता एकटी हनीमूनला परदेशात गेली.’ VIDEO: मतदानासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या