मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; 'सर्कस' आणि 'फोन भूत' एकाच दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; 'सर्कस' आणि 'फोन भूत' एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन भूत'मध्ये खास भूमिका साकारत आहे

    मुंबई, 27 नोव्हेंबर- लॉकडाऊन   (Lockdown)   शिथिल झाल्यानंतर बॉलिवूडमधील   (Bollywood)  अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर, सर्व मोठे चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा करत आहेत. गेल्या काही दिवसांत काही मोठ्या चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा समोर आल्या आहेत. ज्यामध्ये रणवीर सिंह   (Ranvir Singh)  आणि कतरिना कैफसारखे   (Katrina Kaif)  स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत. 'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन भूत'मध्ये खास भूमिका साकारत आहे. दोन्ही स्टार्सच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर होणार आहे.दोन्ही स्टार्सचे चाहते त्यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. आता या लढतीत कोण बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे. 'फोन भूत'मध्ये असणार हे त्रिकुट- तरणने ट्विट केले की, गुरमीत सिंग दिग्दर्शित कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी फेम फोन भूत पुढील वर्षी १५ जुलै रोजी प्रदर्शित होईल. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस'- तरणने आणखी एका ट्विटमध्ये सांगितले की, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' पुढील वर्षी 15 जुलै रोजी रिलीज होत आहे. रणवीर सिंगचा रोहितसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. तो याआधी रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी'मध्ये दिसला आहे. या चित्रपटात रणवीरशिवाय जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे आणि वरुण शर्मा यांच्याही विशेष भूमिका आहेत. पाहिले तर, दोन्ही चित्रपटांची स्टारकास्ट जबरदस्त आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर त्यांच्यात एक तगडी टक्कर पाहायला मिळणार हे नक्की.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Katrina kaif, Ranvir singh

    पुढील बातम्या