मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /83: अखेर प्रतीक्षा संपली, 83 यादिवशी होणार रिलीज; रणवीर सिंगने केली घोषणा

83: अखेर प्रतीक्षा संपली, 83 यादिवशी होणार रिलीज; रणवीर सिंगने केली घोषणा

या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.

मुंबई, 26 सप्टेंबर- बॉलिवूडचा(Bollywood) सध्या बहुचर्चित चित्रपट म्हणजे '83' होय. कबीर खान(Kabir Khan) यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पादुकोण ही कपिल देव(Kapil Dev) यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारली आहे. चाहत्यांची उत्सुकता अखेर संपली आहे. कारण नुकताच रणवीर सिंगने आपल्या सोशल मीडियाद्वारे चित्रपटाच्या रिलीजींगची घोषणा केली आहे.

2019पासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. तेव्हाच या चित्रपटातील कलाकरांचं फर्स्ट लूकसुद्धा समोर आलं होत. ते पाहून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली होती. मात्र कोरोना परिस्थितीमुळे चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यातूनचं रखडलं होतं. त्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. मात्र आज अखेर या चित्रपटाच्या रिलीजबद्दल रणवीर सिंगने स्वतः आपल्या सोशल मीडियाद्वारे ही अपडेट दिली आहे. रणवीर सिंगने आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत म्हटलं आहे, 'इट्स टाईम टू 83... सिनेमा रिलीज इन ख्रिसमस' अर्थातच येत्या ख्रिसमसला 83 आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते खूपच खुश झाले आहेत. रणवीरसोबत या चित्रपटात अनेक कलाकार असणार आहेत.

(हे वाचा:Honsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज; चाहत्यांना झाली...)

या चित्रपटातील रणवीर सिंगचा पहिला लूक समोर येताच लोक आश्चर्यचकित झाले होते. कारण रणवीर हुबेहूब कपिल देव यांच्यासारखा दिसत होता. इतकंच नव्हे तर चित्रपटासाठी रणवीरने कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडेही गिरवले होते. फक्त रणवीरच नव्हे तर चित्रपटातील इतर सर्वच खेळाडूंनी चित्रपटासाठी ट्रेनिंग घेतलं आहे. तसेच प्रत्येक सीन रियल वाटावा यासाठी तासांतास मैदानावर घामदेखील गाळलं आहे. या चित्रपटात दीपिकासुद्धा अगदी वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. दीपिकाचा पहिला लूकसमोर आला होता. त्यावेळी ती लहान केस आणि ब्लॅक टी शर्टमध्ये दिसून आली होती.

First published:
top videos

    Tags: Deepika padukone, Entertainment, Ranvir singh