Home /News /entertainment /

Honsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज; चाहत्यांना झाली SIDNAAZची आठवण

Honsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज; चाहत्यांना झाली SIDNAAZची आठवण

नुकताच शेहनाज गिलच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. शेहनाज 'होंसला रख' या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे.

  मुंबई, 26 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता(Actor) आणि बिग बॉस विजेता(Bigg Boss Winner) सिद्धार्थ शुक्ला(Sidharth Shukla) च्या अचानक मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबा सोबत त्याचे मित्र आणि चाहत्यांना सुद्धा यावर अजूनही विश्वास बसत नाहीय. तसेच दुसरीकडे सिद्धार्थची गर्लफ्रेंड शेहनाज गिलचीदेखील (Shehnaz Gill)वाईट अवस्था झाली होती. शेहनाज आणि सिद्धार्थ ची लव्हस्टोरी चाहत्यांना खूपच पसंत पडत होती. शेहनाजला सध्या या परिस्थितीतीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हळूहळू शेहनाज सामान्य स्थितीत येत असल्याचं म्हटलं जात आहे. शेहनाज आता आपल्या प्रोफेशनल कमिटमेंट लवकरच पूर्ण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
  नुकताच शेहनाज गिलच्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. शेहनाज 'होंसला रख' या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शेहनाजसोबत अभिनेता आणि पंजाबी सिंगर दिलजीत दोसानजी आणि अभिनेत्री सोनम बाजवा दिसून येणार आहेत. चित्रपटाचं पोस्टर रिलीज होताच चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सर्वजण शेहनाजला धीर देत तिचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच वेळेनुसार सर्व ठीक होईल असं सांगत शेहनाजला या दुःखातून सावरण्यास मदत करत आहेत. (हे वाचा:सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा म्यूझिक VIDEO लवकरच होणार रिलीज ... ) चित्रपटाचं पोस्टर रिलीज होताच चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसेच शेहनाजला शुभेच्छा देत आहेत. तिला मजबूत होण्यास सांगत आहेत. दिलजीतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत हा पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तसेच उद्या दुपारी १ वाजता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहितीही दिली आहे. चित्रपटाचं पोस्टर खूपच इंटरेस्टिंग वाटत आहे. पोस्टरवर दिलजीतने तोंडाला दुधाची बाटली लावली आहे. तर शेहनाज आणि सोनममी आपल्या हातात लहान मुलांची खेळणी आणि कपडे घेतली आहेत. यावरून हा एक कॉमेडी तडक असणार आहे. हे स्पष्ट होत आहे. हा चित्रपट येत्या १५ ऑक्टोबरला अर्थातच दसऱ्याला रिलीज केला जाणार आहे. चाहते आपल्या लाडक्या शेहनाजला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. (हे वाचा:सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलच्या वडिलांनी मुलीसाठी घेतला मोठा ... ) सध्या सोशल मीडियावर शेहनाज आणि सिद्धार्थचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. चाहते सिडनाजचे प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा बघत असतात. बिग बॉस १२' मध्ये हे दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यामध्ये जवळीकता निर्माण झाली होती. या दोघांची अनोखी केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या दोघांना चाहते नेहमी एकत्र पाहण्यासाठी धडपडत असत. या दोघांनी अनेक कार्य्रक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Sidharth shukla

  पुढील बातम्या