मुंबई, 14 सप्टेंबर- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा आहे. जो केवळ त्याच्या अभिनयासाठीच नव्हे तर त्याच्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी देखील ओळखला जातो. देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा लोक त्याच्या फॅशन सेन्सला पसंती देत आहेत. हा फोटो त्या अभिनेत्याचा आहे जो आज लाखो लोकांसाठी ‘स्टाईल आयकॉन’ आहे. शिवाय आपल्या हटके स्टाइलमुळे अनेकवेळा हा अभिनेता ट्रोलदेखील होतो. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक लहान मुलगा दिसत आहे. ज्याची हेअरस्टाईल खूपच स्टायलिश आहे. कित्येक वर्षापूर्वी अशी अनोखी हेयर स्टाईल असणारा हा मुलगा सामान्य माणूस असू शकत नव्हता. आपण कोणत्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत हे आतापर्यंत तुम्हाला समजले असेलच.आम्ही बोलत आहोत बॉलिवूडमधील सर्वात उत्साही आणि अतिशय प्रतिभावान अभिनेता रणवीर सिंहबद्दल. या व्हायरल फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला रणवीर सिंह आहे. रणवीर सिंहने केवळ आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं नाही. तर तो आपल्या फॅशन सेन्सनेसुद्धा सोशल मीडियावर चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. सोबतच रणवीर सिंहने बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या दीपिका पादुकोणसोबत लग्न केलं आहे. या दोघांची जोडी प्रचंड पसंत केली जाते. या दोघांना बॉलिवूडचं पॉवर कपलदेखील म्हटलं जातं. या दोघांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. राम लीला ते बाजीराव मस्तानी आणि पद्मावत ते ‘83’ पर्यंत हे दोघे जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर एकत्र आले, तेव्हा तेव्हा तो चित्रपट नेहमीच सुपरहिट ठरला आहे.
**(हे वाचा:** मलायकाला डेट करण्यापूर्वी नणंद अर्पिताच्या प्रेमात होता अर्जुन कपूर; असा झाला ब्रेकअप ) रणवीर सिंहने 2010 मध्ये अनुष्का शर्मासोबत ‘बँड बाजा बारात’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आणि आज जवळपास दशकानंतर त्याने इंडस्ट्रीत आपलं विशेष स्थान प्राप्त केलंआहे. तो लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे.