मुंबई, 22 ऑक्टोबर- सध्या छोट्या पडद्यावर च नव्हे तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरसुद्धा अनेक मजेशीर शो पाहायला मिळत आहेत. हे शो भरभरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ‘केस तो बनता है’ होय. मिनी अमेझॉन टीव्हीवर प्रसारित होणारा हा शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. या शोमधील कोर्टरुममध्ये मजेशीर प्रश्न विचारले जातात तसेच आरोप-प्रत्यारोपदेखील केले जातात. या शोमध्ये अनेक मोठं-मोठे सेलिब्रेटी सहभागी होत असतात. या सेलिब्रेटींवर हे आरोप-प्रत्यारोप होतात. विशेष म्हणजे या कॉमेडी शोमध्ये बॉलिवूड अभिनेता रितेश दशमुख वकिलाची भूमिका साकारत आहे. आत्तापर्यंत या शोमध्ये अनिल कपूरपासून ते करीना कपूरपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. नुकतंच या शोमध्ये बॉलिवूडचा बाबा अर्थातच संजय दत्तने हजेरी लावली होती. ‘केस तो बनता है’ या कार्यक्रमात नुकतंच अभिनेता संजय दत्तने हजेरी लावली होती . यावेळी संजय दत्तला फारच मजेशीर प्रश्न विचारण्यात आले होते. संजय दत्तनेसुद्धा आपल्या खास शैलीत या प्रश्नांना हटके उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमात संजय दत्तला खलनायक या चित्रपटाबाबत विचारण्यात आलं होतं. खलनायक या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचं ठरलं तर यामध्ये कोणत्या अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारावी असं संजयला विचारण्यात आलं होतं. त्यासाठी त्याला तीन अभिनेत्यांच्या नावाचे पर्याय देण्यात आले होते. या पर्यायात अभिनेता विकी कौशल, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग अशी तीन नावे देण्यात आली होती. **(हे वाचा:** Ekta Kapoor: एकता कपूरच्या जवळची व्यक्ती बेपत्ता; निर्मातीने सरकारकडे मागितली मदत ) संजय दत्तने या प्रश्नाचं फारच मजेशीर उत्तर दिलं आहे.त्याचं उत्तर ऐकून प्रेक्षकांना हसू आवरता आलं नाही. या प्रश्नाचं उत्तर देत संजय दत्तने म्हटलं, ‘खलनायक चित्रपटात रणवीर सिंगने काम करू नये. कारण सध्या तो कपडे परिधान करत नाहीय’. संजय दत्त इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने आणखी काही प्रश्नांची चकित करणारी उत्तरे दिली आहेत. या शोमध्ये संजय दत्तला रितेश देशमुखने त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही प्रश्न विचारला होता. यावर उत्तर संजय दत्तने आपल्या 308 गर्लफ्रेंड झाल्या असल्याचं सांगितलं.अभिनेत्याचं हे उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला. सध्या संजय दत्तचा हा एपिसोड प्रचंड चर्चेत आला आहे. संजय दत्तचे चाहते त्याला या शोमध्ये पाहून फारच आनंदी आहेत.
संजय दत्तला 308 गर्लफ्रेंड होत्या. असं ऐकल्यानंतर रितेशने ‘तू रविवारी तरी सुट्टी घेतोस का? असं विचारलं असता संजय दत्तला हसू आवरण कठीण झालं. रितेश आणि संजय दत्तची ही मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. तसेच या कार्यक्रमात गायिका-कॉमेडियन सुगंधा मिश्रासुद्धा आहे. शोमध्ये सुगंधा सर्किटची भूमिका साकारत आहे. सुगंधाला सर्किटच्या रुपात पाहून, आपण इतका सुंदर सर्किट पहिल्यांदाच पहिल्याच संजय दत्तने म्हटलं आहे. सध्या प्रेक्षक अमेझॉन मिनी टीव्हीवर या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. यापूर्वी वरुण धवन, करीना कपूर, अनिल कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांनी हजेरी लावत धम्माल केली आहे.