मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ekta Kapoor: एकता कपूरच्या जवळची व्यक्ती बेपत्ता; निर्मातीने सरकारकडे मागितली मदत

Ekta Kapoor: एकता कपूरच्या जवळची व्यक्ती बेपत्ता; निर्मातीने सरकारकडे मागितली मदत

एकता कपूर

एकता कपूर

एकता कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे प्रेक्षकांना व्यावसायिक आयुष्याबाबत विविध अपडेट्स देत असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 22 ऑक्टोबर-  चित्रपट आणि मालिका निर्माती-दिग्दर्शक एकता कपूर सध्या प्रचंड अडचणीत सापडली आहे. एकीकडे अभिनेत्री आपल्या XXX या वेबसीरिजमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तर दुसरीकडे बालाजी टेलिफिल्म्सचे माजी सीओओ जुल्फिकार खान बेपत्ता झाल्याने एकता चिंतेत आहे. जुल्फिकार यांच्या बेपत्ता होण्याने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. यासाठी एकता कपूरने आता शासनाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकता कपूरने शुक्रवारी भारत सरकार आणि मानवतावादी संस्था केनिया रेड क्रॉसला तिच्या बालाजी टेलिफिल्म्सचे माजी सीओओ जुल्फिकार अहमद खान यांना शोधण्यात मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष या घटनेकडे लागलं आहे.

एकता कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे प्रेक्षकांना व्यावसायिक आयुष्याबाबत विविध अपडेट्स देत असते. ती आपल्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी व्यक्त होते. दरम्यान आज एका वेगळ्याच कारणासाठी एकता कपूरने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. बालाजी टेलिफिल्म्सचे माजी सीओओ जुल्फिकार गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. याबाबत सांगण्यासाठी एकताने सोशल मीडियाचा वापर केला आहे. जुल्फिकार गेल्या काही दिवसांपासून नैरोबीतून बेपत्ता असल्याचं एकता कपूरने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. जुल्फिकार खान जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात नैरोबीमधून बेपत्ता झाले आहेत. जुल्फिकार बेपत्ता होऊन बराच काळ लोटला आहे. एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, एकता कपूरने जुल्फिकार अहमद खानचा एक फोटो शेअर करत मदतीसाठी आवाहन केलं आहे.

(हे वाचा:Bigg Boss 16: सलमान खानने सोडलं बिग बॉस 16? करण जोहर असणार नवा होस्ट )

एकता कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहलंय, "बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचे ​​आमचे माजी सीओओ जुल्फिकार अहमद खान तीन महिन्यांपूर्वी नैरोबी येथून बेपत्ता झाले आहेत. मी परराष्ट्र मंत्रालय आणि केनिया रेड क्रॉस यांना विनंती करते की त्यांनी कृपया याकडे लक्ष द्यावं." एकताने ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. फक्त एकता कपूरच नव्हे तर बिग बॉस 15फेम अभिनेता करण कुंद्रानेसुद्धा एकता प्रमाणेच एक पोस्ट लिहत याबाबत माहिती दिली आहे. पाहूया करणने नेमकं काय लिहलंय.

View this post on Instagram

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

अभिनेता करण कुंद्रा हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असतो.  चाहते  तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून दादा देत असतात. आजही अभिनेत्याची एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. करण कुंद्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहलंय- 'मी जुल्फिकारला अनेक वर्षांपासून ओळखतो. पण लॉकअप दरम्यान त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ते एखादया लहान मुलासारखं निर्मळ आयुष्य जगत होते. ते ज्या ज्या सुंदर ठिकाणांना भेटी देत ​​असत त्यांचे फोटो ते मला नेहमी पाठवत असत. दुर्दैवाने जुल्फिकार 75 दिवसांहून अधिक काळ बेपत्ता आहेत आणि त्यामुळेच आम्ही सर्व काळजीत आहोत. या दिवसांत त्यांच्या कुटुंबियांना किती वेदना होत असतील याचा मी फक्त अंदाजच लावू शकतो. आम्हाला जुल्फी परत हवा आहे. असं म्हणत करणने सर्वांनाच भावुक केलं आहे. एकता आणि करणची ही पोस्ट सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

जुल्फिकार खान नेमके कोण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुल्फिकार अहमद खान हे एक माजी पत्रकार आहेत. तसेच ते एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सचे माजी सीईओदेखील आहेत. जुल्फिकार हे नैरोबी येथून बेपत्ता झाले आहेत. जुल्फिकार यांचे कुटुंबीय जवळपास 80 दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क करु शकलेले नाहीत. जुल्फिकार कुठे आहेत याची त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीच कल्पना नाही. केनियाच्या स्थानिक पोलिसांनादेखील याची माहिती नाही. आता एकता कपूर आणि करण कुंद्राच्या या मोठ्या पावलाने जुल्फिकार यांना शोधण्यात मदत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेत.

First published:

Tags: Bollywood, Ekta kapoor, Entertainment