मुंबई, 1 जुलै- करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील पहिल्याच गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतचं ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील पहिले गाणे “तुम क्या मिले…” प्रदर्शित करण्यात आले आहे. याच गाण्यावरून आलियानं नुकतचं सोशल मीडियावर एक रील शेअर केलं होतं. मग काय रणवीरला कसं गप्प बसू वाटेल, त्याने देखील लगेय याच गाण्यावर भन्नाट रील शेअर केलं आहे. सोशल मीडियावर रणवीरचं हे रील भलतच चर्चेत आलं आहे. शिवाय याला दिलेल्या कॅप्शनने देखील सर्वांचे लक्ष वेधलं आहे. रणवीर सिंहने प्रत्यक्ष समुद्रकिनारी किंवा कोणत्याही सुंदर जागी न जाता स्टुडिओमध्ये ग्रीन स्क्रीनचा वापर करत रोमॅंटिक गाण्यावर मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला रणवीरने भन्नाट कॅप्शन देखील दिली आहे. त्याने म्हटलं आहे की, आलिया एवढं बजेट माझ्याकडे नव्हतं. अर्थात आलियासारखे समुद्रकिनारी जाऊन शूटिंग करण्याएवढे पैसे माझ्याकडे नसल्याने मी असा व्हिडिओ केल्याचे त्याला सांगायचे आहे. त्याच्या या मजेशीर कॅप्शन आणि व्हिडिओ नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्या आहेत.
एका युजरने म्हटलं आहे की, माझ्याकडे 6 रुपये होते ते तुला दिले असते… तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आदिपुरुषच्या व्हीएफएक्स टीमने रणवीरचा व्हिडीओ बनवलाय” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अभिनेत्री आलिया भट्टने यावर ‘लीजेंड’ अशी कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
“तुम क्या मिले…” हे गाणं सिंह आणि श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. “तुम क्या मिले…” गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सध्या हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आलियाने अलीकडेच या गाण्यावरील रिल व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये आलिया समुद्रकिनारी आनंद घेताना पाहायला मिळत आहे. मात्र, रणवीर सिंहने याउलट रोमॅंटिक गाण्यावर मजेशीर रिल बनवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या सोशल मीडियावर रणवीरच्या या रीलची चर्चा रंगलेली आहे.