जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ranveer Singh: न्यूड फोटोसोबत झालीय छेडछाड; पोलिसांसमोर रणवीर सिंहचा मोठा दावा

Ranveer Singh: न्यूड फोटोसोबत झालीय छेडछाड; पोलिसांसमोर रणवीर सिंहचा मोठा दावा

Ranveer Singh: न्यूड फोटोसोबत झालीय छेडछाड; पोलिसांसमोर रणवीर सिंहचा मोठा दावा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. रणवीर अभिनयासोबतच आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलसाठीसुद्धा ओळखला जातो.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 सप्टेंबर-   बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. रणवीर अभिनयासोबतच आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलसाठीसुद्धा ओळखला जातो. परंतु काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने न्यूड फोटोशूट करत एकच खळबळ माजवली होती. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या फोटोशूटमुळे रणवीर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली अभिनेत्याविरुद्ध पोलिसांत तक्रारदेखील करण्यात आली आहे. दरम्यान आता रणवीरने पोलिसांसमोर मोठा दावा केला आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. रणवीर सिंह न्यूड फोटोशूट प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या सात फोटोंपैकी एक फोटो त्याच्या पोस्टचा भाग नव्हता. त्या फोटोसोबत पूर्णपणे छेडछाड करण्यात आली आहे. रणवीर सिंहने दावा केला आहे की, हा फोटो आपण इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या त्या 7 फोटोंमधील नाहीय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंपैकी एक, जो न्यूयॉर्कच्या पेपर मॅगझिनसाठी रणवीर सिंहच्या ‘न्यूड फोटोशूट’चा भाग असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात कथितपणे त्याचे प्रायव्हेट पार्ट दिसत होते. परंतु हे फोटो मॉर्फ करण्यात आले आहेत. रणवीरने 29 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या जबाबात मुंबई पोलिसांना ही महत्त्वाची माहिती दिली आहे. (हे वाचा: दिल्ली पोलिसांकडून जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरु; काय आहे नेमकं प्रकरण? **)** ज्या फोटोच्या आधारावर मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहवर अश्लीलतेच्या आरोपाखाली 26 जुलै रोजी एफआयआर नोंदवला होता, तो फोटो मॉर्फ असल्याचा दावा अभिनेता करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरच्या दाव्यानंतर पोलिसांनी आता हा फोटो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला आहे. जिथे फोटोत छेडछाड झाली आहे की नाही हे कळू शकते. जर फोटोसोबत छेडछाड झाल्याचं निष्पन्न झाल्यास रणवीर सिंहला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. कारण फोटोमध्ये त्याचे प्रायव्हेट पार्ट दिसत असल्याच्या आधारावर एफआयआर नोंदवण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात