मुंबई**,** 15 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चेन्नईमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. फिरकी गोलंदाजीला साथ देणाऱ्या चेन्नईच्या पिचवर इंग्लंडचा पहिला डाव केवळ 134 धावांत आटोपला. तर दुसरीकडे भारताने मात्र दोन्ही डावात दमदार फलंदाजी करुन 400 पेक्षा अधिक धावांचं आव्हान इंग्लंडमोर उभं केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे भारत अद्याप फलंदाजी करत आहे. त्यामुळे हे आव्हात आता हळहळू 450 धावांच्या दिशेने जात असताना दिसत आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) तुम्हाला किती धावांचं आव्हान हवं आहे असा सवाल क्रिकेट चाहत्यांना केला. त्याच्या प्रश्नावर नेटकऱ्यांनी देखील चकित करणारी उत्तर दिली आहेत.
What target should India set for England ? 🏏 #INDvENG
— Ranveer Singh (@RanveerOfficial) February 15, 2021
काय म्हणतायेत क्रिकेट चाहते? काही नेटकऱ्यांच्या मते भारताने किमान 450 ते 500 धावांच्या आसपास आव्हान द्यावं. इतकं आव्हान दुसऱ्या डावात पुर्ण करणं इंग्लंडच्या संघाला शक्य होणार नाही. अन् आपल्याला मोठ्या धावसंख्येनं विजय मिळवता येईल. तर दुसरीकडं काही चाहत्यांच्या मते भारताने सर्व फलंदाज बाद होईपर्यंत फलंदाजी करावी. इंग्लंडच्या संघानं पहिल्या सामन्यात भारताला तब्बल तीन दिवस गोलंदाजी करायला लावली होती. त्याची परतफेड करण्याची ही योग्य संधी आहे. रणवीरच्या या ट्विटवर आतापर्यंत हजारो क्रिकेटरसीकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
350 above is sufficient
— Devanshu Maheshwari (@beingdevanshu19) February 15, 2021
And from there jitne banane hai bana do #IndvsEng
Whatever the lead, we're sure it'll be boht hard! 😉
— Star Sports (@StarSportsIndia) February 15, 2021
What's your prediction?#INDvENG #IndiaTaiyarHai
अवश्य पाहा - IND vs ENG : ‘काही जणांना तर’….पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं उत्तर चेन्नईच्या पिचवर संयमी बॅटिंग करणे अवघड आहे, हे लक्षात येताच ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. अजिंक्य रहाणेच्या आधी आलेला पंत फार कमाल करु शकला नाही. पंत फक्त 8 रन काढून आऊट झाला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला रहाणे दुसऱ्या डावात झटपट आऊट झाला. रहाणेनं फक्त 10 रन काढले. मोईन अलीलं त्याला आऊट केलं. मात्र त्यानंतर विराट आणि अश्विननं चांगली फलंदाजी करत भारताची आघाडी 400 धावांच्या पार नेली आहे.