मुंबई, 4 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी असलेले अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीच चर्चेत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या स्टारकपलच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधान आलं होतं. दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या कुजबूज सोशल मीडियाच्या माध्यमातून कानी येत होत्या. विभक्त होणाच्या चर्चांदरम्यान रणवीरचं नवं ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय. या ट्विटमधून रणवीरने त्यांच्या नात्याविषयी सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रणवीर सिंहने एक ट्विट केलं आहे. रणवीरने केलेल्या या नव्या ट्विटमध्ये त्यानं दीपिकासाठी ‘माय क्विन’ असं म्हटलंय. एका आंतरराष्ट्रीय दागिन्यांच्या ब्रँडने दीपिका पदुकोणला आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवले आहे. या ब्रँडने दीपिकाचा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोवर रणवीर सिंगने माय क्वीन आम्हाला अभिमान वाटतोय, अशी कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटनं दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत.
The Maison is pleased to welcome the Indian actress, producer and philanthropist @deepikapadukone to the family as its newest ambassador. #Cartier pic.twitter.com/mwjr8qY2Vm
— Cartier (@Cartier) October 3, 2022
रणवीरच्या या ट्विटने त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांवर पूर्णविराम लावला आहे. त्यामुळे आपल्या आवडते कलाकारांमध्ये सगळं ओक्केमध्ये असल्याचं पाहूण चाहेत कमालीचे खूश आहेत. 2018मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 6 वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाची सर्वत्र प्रचंड चर्चा झाली होती.
दरम्यान, रणवीर आणि दीपिका लवकरच एका चित्रपटाचा भाग होणार असल्याचीही बातमी समोर येत आहे. म्हणजेच त्यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार आहे. याआधी ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम लीला’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांमध्ये ते एकत्र दिसले आहेत.