मुंबई, 30 नोव्हेंबर : सलमान खानच्या होस्टिंगसाठी ओळखला जाणारा रिअलिटी शो Bigg Boss 13 सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोचा अर्धा अधिक प्रवास पूर्ण झाला असून सध्या प्रत्येक स्पर्धक या शोमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतना दिसणार आहे. त्यामुळे सध्या शोमध्ये वाद-विवाद वाढताना दिसत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात मारामारी होताना दिसली. याशिवाय नेहमीप्रमाणे या ठिकाणी अजब वक्तव्य केली जात आहेत. नुकतंच शहनाझ गिलनं स्वतः बद्दल एक असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सिद्धार्थ शुक्ला तिच्यावर भडकलेला दिसत आहे. बिग बॉसच्या घरात शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला आणि देबोलीना एकमेकांशी गप्पा मारतना दिसत आहेत. दरम्यान देवोलिना शहनाझला सांगते की, तु स्वतः बद्दल स्वतः बद्दल 5 चांगल्या गोष्टी आणि 5 वाईट गोष्टी सांग. यावर सिद्धार्थ म्हणाला, तिला स्वतः बद्दल काही माहितच नाही तर ती काय सांगणार आहे. इतक्यात शहनाझ म्हणाली, मला फ्रेंड्स निवडण्यात खूप प्रॉब्लेम होतो आणि मी थोडीशी कॅरॅक्टरलेस सुद्धा आहे. शहनाझला असं बोलताना बघून सिद्धार्थला आश्चर्य वाटतं.
यानंतर सर्वजण शहनाझला विचारतात तुला या शब्दाचा अर्थ माहित आहे का? त्यावर शहनाझ सांगते मी कॅरॅक्टरलेस आहे मात्र गुड वेमध्ये शहनाझच्या या बोलण्यावर सिद्धार्थ आणि देवोलिना तिला चिडवताना दिसले. पण शहनाझला ते काय बोलत आहेत हे समजत नव्हतं. पण तिच्या या वागण्यामुळे घरातील सर्वांचच मनोरंजन होताना दिसत आहे.

)







