मुंबई, 30 एप्रिल: अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिचा आगामी सिनेमा ‘मर्दानी 2’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या सिनेमाचं पहिल्या शेड्यूलमधील शूटींग पूर्ण झालं असून आता दुसऱ्या शेड्यूलच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या दरम्यान ‘मर्दानी 2’मधील राणी मुखर्जीच्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील फर्स्ट लुक समोर आला आहे. यशराज फिल्मच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पोलिस वर्दीतील राणीचा लुक शेअर करण्यात आला.
#RaniMukerji dons the cop uniform in #Mardaani2 | @Mardaani2 pic.twitter.com/3DolnsxVSl
— Yash Raj Films (@yrf) April 30, 2019
वाचा : विकी कौशलशी ब्रेकअपनंतर हरलीन सेठीनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया पोलिस वर्दीतील या लुकमध्ये राणी खूपच रुबाबदार दिसत आहे. गोपी पुतरन यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘मर्दानी 2’मध्ये राणी मुखर्जी एसपी शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारत आहे. 2014मध्ये आलेल्या ‘मर्दानी’मध्ये राणी याच भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं त्यानंतर आता ‘मर्दानी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. हा सिनेमा 2019मध्ये रिलीज करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे मात्र सिनेमाची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाही. वाचा : ‘तुला पाहते रे’मध्ये ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची एन्ट्री या सिनेमाची कथा एका प्रामाणिक महिला पोलिस ऑफिसरवर आधारित असून याच्या पहिल्या भागात राणी लहान मुलांची तस्कारी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना दिसली होती. ‘मर्दानी 2’च्या दुसऱ्या शेड्यूलमधील शूटिंग राजस्थानमध्ये पुढच्या आठवड्यात सुरु होणार आहे. राजस्थानच्या कोटा आणि जयपूर या भागात सिनेमातील काही दृश्यांचं शूटिंग होणार आहे मात्र हाच सिनेमातील महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय सिनेमातील उर्विरित सर्व शूटिंग हे मुंबईमध्ये होणार आहे. वाचा : ‘नाणं एकदम खणखणीत’, गॉडफादर नसतानाही ‘हे’ सेलिब्रिटी बॉलिवूडमध्ये यशस्वी
राणी मुखर्जी मागील वर्षी ‘हिचकी’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिनं एका अशा शिक्षिकेची भूमिका साकारली होती जी ‘नर्वस सिस्टम डिसऑर्डर’ म्हणजेच ‘Tourette syndrome’ या आजारानं ग्रस्त आहे. राणीच्या या सिनेमाचं सर्वांकडून कौतुकही झालं होतं.