जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'रंग माझा वेगळा' मधील दीपाचा ग्लॅम अवतार पाहून चाहते म्हणताहेत- परमसुंदरी!

'रंग माझा वेगळा' मधील दीपाचा ग्लॅम अवतार पाहून चाहते म्हणताहेत- परमसुंदरी!

'रंग माझा वेगळा' मधील दीपाचा ग्लॅम अवतार पाहून चाहते म्हणताहेत- परमसुंदरी!

रेश्मा शिंदेनी सोशल मीडियावर ग्लॅमरस (Reshma Shinde Glamorous Photos ) फोटो शेअर केले आहेत. तिचा हा ग्लॅम लुक पाहून एका चाह्त्याने तिला परमसुंदरीचा किताब दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’  **(Rang Mazha Vegla)**मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील दीपा हे पात्र तर सर्वांचे लाडके आणि आवडते आहे. मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने साकारली आहे. रेश्मा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे काही फोटो व व्हिडिओ चाहत्यांसबोत शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. दरम्यान नुकतेच तिने सोशल मीडियावर ग्लॅमरस  (Reshma Shinde Glamorous Photos ) फोटो शेअर केले आहेत. तिचा हा ग्लॅम लुक पाहून एका चाह्त्याने तिला परमसुंदरीचा किताब दिला आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर स्कर्ट टॉपमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, घर प्रेमाने भरा. तेव्हा ते घर बनते. तिचा हा नवा लुक पाहुन चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

जाहिरात

नेहमी चुडीदारमध्ये दिसणाऱ्या साधीभोळ्या दीपाचा हा ग्लॅम अवतार चाहत्यांना देखील आवडलेला आहे. दीपाच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका चाहत्याने लिहिले की परमसुंदरी, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, जबरा तर एकाने सुंदरी. आणखी एक युजरने लय भारी दिसते आहेस , अशा कमेंट करत चाहत्यांनी तिच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे. वाचा :‘प्रिया माझी रत्नजडित तलवार…’, प्रिया-उमेशच्या संसाराची 10 वर्ष, उखाण्याचा गोड Video Viral खऱ्या आयुष्यात रेश्मा आहे खूप ग्लॅमरस स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने सर्वांचंच लक्ष वेधलं. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. याच विषयावर आधारीत ही मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आले आहे. या मालिकेतील रेश्माच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. खऱ्या आयुष्यात रेश्मा खूप ग्लॅमरस आहे. तिचा हाच अंदाज चाहत्यांना देखील सध्या आवडत आहे. वाचा : Hotness Alert! अभिनेत्री काजोलच्या बहिणीने BIKINI मध्ये केला योगा; फोटो झाले VIRAL रेश्माने यापूर्वी या मालिकांमध्ये केले आहे काम अभिनेत्री रेश्मा शिंदेने याआधी काही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘चाहूल’ या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात