जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'प्रिया माझी रत्नजडित तलवार...', प्रिया-उमेशच्या संसाराची 10 वर्ष, उखाण्याचा गोड Video Viral

'प्रिया माझी रत्नजडित तलवार...', प्रिया-उमेशच्या संसाराची 10 वर्ष, उखाण्याचा गोड Video Viral

'प्रिया माझी रत्नजडित तलवार'; Priya Bapat ने शेअर केला लग्नातील उखाण्यांचा व्हिडिओ

'प्रिया माझी रत्नजडित तलवार'; Priya Bapat ने शेअर केला लग्नातील उखाण्यांचा व्हिडिओ

मराठी इंडस्ट्रीतील गोड आणि हटके कपल अशी ओळख असलेले अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त प्रियाने त्यांच्या लग्नातील उखाण्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 ऑक्टोबर: मराठी इंडस्ट्रीतील गोड आणि हटके कपल अशी ओळख असलेले अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त प्रियाने लग्नातील उखाण्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियाने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. प्रिया अनेकदा सोशल मीडियावर उमेशबाबत दिलखुलास प्रेम व्यक्त करत असते. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नाला आज 10 वर्षे झाली आहेत. आजही त्यांच्यातील केमिस्ट्री खूप भारी वाटते.

जाहिरात

प्रियाने व्हिडीओ शेअर करत उमेशला शुभेच्छा दिल्या आहेत. ’ मिस्टर कामत एक दशक झालं अजून आजन्म बाकी आहे. दिवसागणिक माझं तुझ्यावरचं प्रेम वाढत आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

तिने शेअर केलेल्या या व्हिडीओत उमेश उखाणा घेताना दिसत आहे. रुप जीच अलवार प्रिया माझी रत्नजडित तलवार असा उखाणा उमेश घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. अशी सुरु झाली होती प्रिया बापट आणि उमेश कामतची लव्हस्टोरी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. प्रिया आणि उमेश एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात