जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तू तेव्हा तशी' मध्ये अभिज्ञा भावेचा असणार असा लुक, समोर आला सेटवरील Video

'तू तेव्हा तशी' मध्ये अभिज्ञा भावेचा असणार असा लुक, समोर आला सेटवरील Video

'तू तेव्हा तशी' मध्ये अभिज्ञा भावेचा असणार असा लुक, समोर आला सेटवरील Video

झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ( Tu Tevha Tashi ) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत अभिज्ञा भावे ( abhidnya bhave)दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 मार्च- झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ( Tu Tevha Tashi ) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत अभिज्ञा भावे **( abhidnya bhave)**दिसणार आहे. या मालिकेत तिच्या लुकची  **( abhidnya bhave  first look)**पहिली झलक समोर आली आहे. तिनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा या मालिकेच कसा लुक असणार याची झलक पाहायला मिळत आहे. अभिज्ञा भावेने तिच्या इन्स्टावर तू तेव्हा तशी मालिकेच्या सेटवरली एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अभिज्ञा पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. ती मेकअप रूममध्ये मेकअप करताना दिसत आहे. तिनं हा व्हिडिओव शेअर करत मालिकेच्या टीमचं आभार मानलं आहे. तिनं शुटींगचा पहिला दिवस माझा असा होता असं व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे. तिच्या या व्हिडिओवर स्वप्नील जोशीपासून अनेक सेलेब्सच्या कमेंट येत आहेत. शिवाय चाहत्यांच्या देखील कमेंट येत आहेत. चाहते तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नाजूक वेल नाही, नागीण आहे ही!..पुष्पवली असं म्हणत तिनं एक तिचा फोटो शेअर केला आहे. यावरून तर असतचं दिसत आहे की तिची भूमिका काहीशी नकारात्मक आहे, आता याचा उलगडा मालिका सुरू झाल्यानंतरच होईल. वाचा- ‘असं काम करता कशाला ज्यामुळं…’, राज कुंद्रा तोंड लपवल्यामुळे पुन्हा ट्रोल बऱ्याच वर्षांनी लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी मालिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याच्यासोबतची जोडीही खूप खास आहे. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत स्वप्निल आणि अभिनेत्री शिल्पा तुळस्कर एक फ्रेश जोडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

जाहिरात

स्वप्निल जोशी चार वर्षानंतर छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जीवलगा’ ही त्याची शेवटची मालिका होती. स्वप्निल सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोचा एक भाग आहे. तो या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर दुसरीकडे, शिल्पा तुळस्करही शेवटची ‘तुला पाहते रे’ मध्ये सुबोध भावेसोबत दिसली होती. स्वप्निल आणि शिल्पाची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येत आहे. त्यामुळे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात