मुंबई, 3एप्रिल- अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar ) सोशल मीडियावर सतत नवीन व्हिडिओ असतील किंवा फोटो शेअर करत असतो. विशेषकरून तो बायको मितालीसोबत **(Mitali Mayekar)**काही भन्नाट रील्स शेअर करत असतो. याशिवाय सिद्धार्थ फोटोग्राफी वेड आहे. तो प्राण्यांचे काही सुंदर फोटो शेअर करत असतो. नुकताच सिद्धार्थनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेली कॅप्शन सध्या सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. सिद्धार्थनं इन्स्टावर त्याच्या कुत्र्यासोबत एक छानसा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं म्हटलं आहे की, असा एक जो काही बोलत नाही पण न बोलताही बरच काही बोलतो…त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेम व्यक्त केलं जातं आहे. सिद्धार्थच्या या कित्र्याचं नाव डोरा आहे. अनेकवेला तो डोरासोबत व्हिडिओ शेअर करताना दिसतो. वाचा- फिल्मफेअरच्या कव्हर पेजवर झळकणारी अमृता खानविलकर ठरली पहिली मराठमोळी अभिनेत्री एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, !!माणूस शेवट पर्यंत साथ देणार नाही पण ह्यांना एकदा जीव लावला कि शेवट पर्यंत साथ देतात_!! निस्वार्थ प्रेम तर आणखी एकानं म्हटलं आहे की, प्राणी कधीच धोका देत नाहीत आणि माणसापेक्षा चांगल काम देखील करतात. याशिवाय अनेकांनी सिद्धार्थच्या या फोटोला क्यूट म्हणत त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. वाचा- ‘आता पुढचा प्रवास हिच्या सोबत..’ किरण गायकवाडच्या कुटुंबात नवीन व्यक्तीची एंट्री अनेक सेलेब्स आहेत ते प्राण्यांच्यावर जीवापाड प्रेम करताना दिसतात. मानसी नाई, जुई गडकर या कॅट मॉम म्हणून ओळखल्या जातात. या दोघींनीही घरात अनेक मांजरी पाळ्याल्या आहेत. त्या मुलाप्रमाणे त्यांचा सांभाळ करताना दिसतात.
सिद्धार्थ चांदेकरच्या नुकत्याच आलेल्या झिम्मा या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्याच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. याशिवाय छोट्या पडद्यावर टीव्ही शो होस्ट करताना देखील दिसतो. मालिका असो की सिनेमा वेगळ्या भूमिका साकारून त्याने त्याच्या अभिनयाची कसब दाखवली आहे.