मुंबई, 15 फेब्रुवारी : कपूर कुटुंबीयांमुळं बॉलिवूड सिनेसृष्टीला एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. आधी राज कपूर यांनी ‘आवारा’, ‘बरसात’, ‘श्री 420’ यांसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळाच फॅन फॉलोइंग तयार केला. अन् त्यांची परंपरा पुढे राजीव, ऋषी आणि रणधीर कपूर यांनी पुढे नेली. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे राजीव आणि ऋषी यांच्या तुलनेत रणधीर कपूर (Randhir Kapoor) मात्र क्रांतिकारी विचारांचे होते असं म्हटलं जातं. आज रणधीर कपूर यांचा 74 वा वाढदिवस आहे. (Randhir Kapoor Birthday) या निमित्ताने जाणून घेऊया रुल्स ब्रेकर रणधीर यांच्या करिअरमधील काही थक्क करणाऱ्या गोष्टी… रणधीर कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा ते अत्यंत लाजाळू स्वभावाचे होते. 1969 साली ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट अभिनेत्री बबीता यांच्याशी झाली. अन् पहिल्याच नजरेत ते बबीता यांच्या प्रेमात पडले. पुढे अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. चित्रपटांच्या निमित्तानं दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले अन् त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या लग्नाला वडिल राज कपूर यांनी विरोध केला होता. कारण कपूर कुटुंबात अभिनेत्रींसोबत लग्न करण्याची पद्धत नव्हती. पंतु बबिता यांच्यासोबत लग्न करण्यासाठी रणधीर यांनी आपली कौटुंबीक परंपरा मोडली. अवश्य पाहा - खोल समुद्रात अभिनेत्रीची स्टंटबाजी; खतरनाक शार्कला खाऊ घातलं जेवण करीश्मा आणि करिनाला केलं स्टार कपूर कुटुंबातील स्त्रिया अभिनेत्री देखील होत नसत. किंबहूना चित्रपटात काम करण्याची संमती त्यांना नसे. परंतु हा नियम देखील रणधीर यांनी मोडला. त्यांनी आपली मोठी मुलगी करिश्माला अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. शिवाय चित्रपटात काम करण्यासाठी प्रोत्साहन देखील दिलं. करिश्मानं जेव्हा सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा कपूर कुटुंबात मोठा अंतर्गत कलह निर्माण झाला होता. परंतु रणधीर देखील आपल्या मुलीच्या करिअरसाठी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आपली दुसरी मुलगी करिनाला देखील त्यांनी चित्रपटात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. रणधीर यांनी आपली कौटुंबिक परंपरा मोडत कपूर मुलींना प्रोत्साहन दिल्यामुळेच आज करिश्मा आणि करिना या नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







