राम्या कृष्णन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे हे फोटोही चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अभिनेत्रीने तिच्या काळ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची हटके स्टाइल पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये (Ramya Krishnan Latest Photos) ती पूर्ण मेकअपमध्ये दिसत आहे. काळ्या रंगाची साडी, डोळ्यात काजळ, कानातले मोठे झुमके आणि चेहऱ्यावर स्मितहास्य असलेली रम्या खूप सुंदर दिसत आहे. फोटोंमधलं तिचं सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं खूप कठीण आहे.
51 वर्षीय रम्या कृष्णनचे फोटो (Ramya Krishnan glamorous photoshoot) पाहून लोक सोशल मीडियावर जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'मॅडम तुम्ही खूप क्यूट दिसत आहात'. दुसऱ्याने लिहिले, 'जेव्हा राजमाता राजकुमारी होती.' तिसर्याने लिहिले, 'तू नेहमीच सुंदर दिसतेस.' चौथ्याने लिहिले, 'लव्ह यू मॅडम… तुमचे डोळे खूप गोड आहेत'. रम्याच्या फोटोंवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.
चाहते रम्या कृष्णनचं कौतुक करताना थकत नाहीत. सोशल मीडियावर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सचा पाऊस पडला आहे. रम्याच्या फोटोंना 37 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
रम्या कृष्णनच्या फिल्म्सच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती अलीकडेच अभिनेता नागार्जुन अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या बंगाराजू चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने अक्किनेनीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
रम्याने साऊथ व्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही काम केले आहे. इथे तिने नाना पाटेकरसारख्या अभिनेत्यांसोबत रोमान्स केला आहे. अभिनेत्रीचे रोमँटिक आणि बोल्ड अंदाज चित्रपटांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.