जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'रामायण'फेम विभीषणने रेल्वेसमोर उडी देत संपवलेलं आयुष्य; भयानक होतं यामागचं कारण

'रामायण'फेम विभीषणने रेल्वेसमोर उडी देत संपवलेलं आयुष्य; भयानक होतं यामागचं कारण

 विभीषण

विभीषण

‘रामायण’ ही टीव्ही सीरियल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. तेव्हा पुन्हा एकदा ही सीरियल प्रसारित करण्यात आली होती.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 11 मार्च- ‘रामायण’ ही टीव्ही सीरियल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. तेव्हा पुन्हा एकदा ही सीरियल प्रसारित करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्या वेळी ही सीरियल ‘टीआरपी’मध्ये टॉपवर होती. एवढचं काय, अनेकजण पूर्वीच्या काळी जेव्हा ही सीरियल टीव्हीवर लागत होती, तेव्हा कसे वातावरण असायचे, याच्या आठवणीसुद्धा सांगत होते. या सीरियलमध्ये एक पात्र होतं विभीषण, जे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हे पात्र साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांच्याबद्दलच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ‘झी न्यूज’ने याबाबत वृत्त दिलंय. रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ ही टीव्ही सीरियल लोकप्रियच नाही, तर नेहमी स्मरणात राहणारी आहे. या टीव्ही सीरियलमध्ये भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान, रावण आणि विभीषण आदी भूमिका साकारणारे कलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आज आपण या टीव्ही सीरियलमधील विभीषणची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश रावल यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. मुकेश याचं 2016 मध्ये निधन झालयं. चला तर, आज आपण मुकेश यांना विभीषणाची भूमिका कशी मिळाली आणि त्यांचा मृत्यू कसा झाला, हे जाणून घेऊ. (हे वाचा: Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने 3 वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न; मॅनेजरने केलेले धक्कादायक खुलासे ) रंगभूमीशी निगडीत अभिनेता अभिनेते मुकेश रावल हे बराच काळ रंगभूमीशी निगडीत होते. येथेच एका नाटकादरम्यान रामानंद सागर यांची नजर त्यांच्यावर पडली. मुकेश यांनी मेघनादसोबत विभीषण या भूमिकेसाठीही ऑडिशन दिली होती. मात्र, नंतर त्यांना विभीषणाची भूमिका ऑफर करण्यात आली. या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय दिला. त्यामुळेच आजही ही भूमिका अनेकांच्या स्मरणात आहे. मुंबई येथे केली आत्महत्या मीडिया रिपोर्ट्सनुसार मुकेश रावल यांनी 2016 मध्ये आत्महत्या केली. मुंबईतील कांदिवली स्टेशनजवळील रुळांवर त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी असं का केलं? याचं कारणही नंतर सांगितलं गेलं होतं. मुकेश यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते प्रचंड नैराश्यात होते, असं सांगितलं जातं. खरं तर मुकेश यांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलीचं त्यांनी लग्न करून दिलं होतं. पण त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    मुलीच्या लग्नानंतर मुकेश पूर्णपणे एकटे पडले होते, व ते मुलाच्या आठवणीनं नैराश्यात गेले होते, असं सांगितलं जातं. दरम्यान, याच नैराश्यातून त्यांनी एकेदिवशी रेल्वे रूळांवर झोपून आत्महत्या केली होती.दरम्यान, रामायण सीरियलमधील बहुतांश कलाकारांचा मृत्यू झाला असला तरी ते त्यांनी केलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या स्मरणात कायम आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात