Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने 3 वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न; मॅनेजरने केलेले धक्कादायक खुलासे
Priyanka Chopra Controversy: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. सध्या प्रियांका आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव मोठं करत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. सध्या प्रियांका आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव मोठं करत आहे.
2/ 8
परंतु एक काळ असा होता जेव्हा प्रियांका आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु अभिनेत्रीने इतकं मोठं पाऊल का उचललं होतं? त्याबद्दल जाणून घेऊया.
3/ 8
काही वर्षांपूर्वी प्रियांकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता याचा खुलासा स्वतः अभिनेत्रीचा मॅनेजर प्रकाश जाजूने केला होता.
4/ 8
प्रकाश जाजूने काही वर्षांपूर्वी ट्विटरवर काही ट्विट केले होते. त्यामध्ये त्याने प्रियांकाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत लिहिलं होतं.
5/ 8
त्याने लिहलं होतं, 'आज इतकी मजबूत दिसणाऱ्या प्रियांकाने कधीकाळी 2..3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मी मोठ्या प्रयत्नाने तिला यापासून थांबवलं होतं.
6/ 8
प्रियांका आणि एक्स बॉयफ्रेंड असीम मर्चंट यांच्यामध्ये अनेकवेळा भांडणे होत असत. प्रियांका रात्ररात्रभर चिंतेत असायची. तिने अनेकवेळा आपल्याला फोन केल्याचंही मॅनेजरने म्हटलं होतं.
7/ 8
प्रियांका आपल्यासोबत काहीही बरं वाईट करुन घेईल या भीतीपोटी तिला खुर्चीला बांधून ठेवण्यात आलं असल्याचंही प्रकाशने उघड केलं होतं.
8/ 8
दरम्यान प्रकाश जाजूविरोधात प्रियांका आणि तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करत आपल्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मॅनेजरला काही काळ तुरुंगातही राहावं लागलं होतं.