मुंबई, 6 ऑक्टोबर- दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रटावरुन सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. या टीजरवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत. चित्रपटातील व्यक्तीरेखांचा लुक पाहून गदारोळ माजला आहे. यावर आता राजकीय व्यक्तींनीसुद्धा आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. नुकतंच भाजप आमदार राम कदम यांनी कठोर शब्दात या चित्रपटावर टीका केली आहे. इतकंच नव्हे तर चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आमदार राम कदम यांनी काही वेळेपूर्वी एक ट्विट करत म्हटलंय, ‘आदिपुरुष चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पुन्हा एकदा चित्रपट निर्मात्यांनी फालतू लोकप्रियता मिळवण्यासाठी आमच्या देवी-देवतांचा अपमान केला आहे. आमच्या देवी-देवतांचा अपमान करत या लोकांनी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आलीये फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची’.
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी #देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का
दरम्यान आणखी एक ट्विट करत भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे की, अभिनेता सैफ अली खानने त्याच्या आगामी चित्रपट ;आदिपुरुष’ बाबत धक्कादायक विधान केलं आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा सैफ म्हणतो की, रावणाने सीता माईंचं अपहरण केलं ते चित्रपटात न्याय असेल. यामध्ये रावणाची मानवी बाजू दाखवली जाईल. आणि प्रभू श्रीरामासोबतचं रावणाचं हे युद्ध चित्रपटात न्याय ठरेल.
Actor #SaifAliKhan makes an extremely shocking statement regarding his forthcoming film Adipurush. Saif who plays Ravan's character says Ravan's abduction of Sita Maa will be justified in the film. Ravan's humane side will be shown and his war against Sri Ram will be justified.
— Ram Kadam (@ramkadam) December 6, 2020
राम कदम यांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावर दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, हिंदूंच्या भावना दुखावणारा कोणताही प्रयत्न भाजप खपवून घेणार नाही. राम कदम यांचं हे वक्तव्य सैफ अली खानच्या एका मुलाखतीतील वक्तव्यावर आधारित आहे. यामध्ये सैफ अली खानने म्हटलं होतं, ‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणाची मानवी बाजू पाहायला मिळणार आहे’. (हे वाचा: Saif Ali Khan: ‘आदिपुरुष’च्या रावणावरुन वाद; सैफ अली खानला आता करायचंय ‘महाभारत’ ) ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. नुकतंच ‘आदिपुरुष’ चा टीजर रिलीज झाला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्हिएफेक्सची प्रचंड खिल्ली उडवण्यात येत आहे. तसेच चित्रपटातील व्यक्तीरेखांच्या लुक्सवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत. या चित्रपटात साऊथ स्टार प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे यांसारखी तगडी स्टार पाहायला मिळत आहे