• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राम गोपाल वर्मांचा Dangerous: भारतातल्या पहिल्या 'समलैंगिक' थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज

राम गोपाल वर्मांचा Dangerous: भारतातल्या पहिल्या 'समलैंगिक' थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा(Ram Gopal Verma) यांच्या ‘डेंजरस’ (Dangerous) या चित्रपटाचा हा पोस्टर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.

 • Share this:
  मुंबई, 12 मे - बॉलिवूडमध्ये (Bollywood) हळूहळू कथानकात मोठा बदल घडून येत आहे. विविध विषयांवर चित्रपट बनू लागले आहेत. सर्वसामान्य सिनेमांच्या कल्पनेला छेद देणारं असंच एक सिनेमा पोस्टर काही महिन्यांपूर्वी रिलीज झालं होतं. दिग्दर्शक रामगोपाल वर्मा ( Ram Gopal Verma)  यांच्या ‘डेंजरस’ (Dangerous) या चित्रपटाचं हे पोस्टर होतं. मात्र या पोस्टरकडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. Dangerous हा चित्रपट समलैंगिक स्त्रियांच्या कथेवर (Lesbian Lovestory)  आधारित आहे. उद्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. त्यामुळे चित्रपटातील अभिनेत्री अप्सरा राणीने (Apsara Rani) आनंद व्यक्त करत आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे.
  अभिनेत्री अप्सरा राणीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘डेंजरस’ चं पोस्टर शेयर करत म्हटलं आहे, ‘कित्येक दिवसांपासून मी ज्या वेळेची आतुरतेने वाट पाहत होते. ती वेळ आत्ता आली आहे. उद्या माझी ही आतुरता संपणार, कारण उद्या माझ्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होतं आहे’. अशा आशयाची ही पोस्ट आहे.
  रामगोपाल वर्मा आपल्या बोल्ड सिनेमांमुळे, बोल्ड नायिकांच्या चित्रणाने नेहमीच चर्चेत असतात. चित्रपटांसाठी नेहमीच हटके विषयांची निवड करत असतात. यावेळी देखील त्यांनी अत्यंत वेगळा असा विषय निवडला आहे. हा विषय आहे ‘समलैंगिक’ लव्हस्टोरीचा. ‘डेंजरस’ या चित्रपटाचं पोस्टर ऑगस्टमध्ये रिलीज झालं होतं. तेव्हा पासूनचं चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची देखील उत्सुकता लागून राहिली होती. आत्ता ही उत्कंठा काही तासांतचं संपणार आहे. (हे वाचा:का व्हावं लागलं खलनायिका? श्रुती अत्रेनं सांगितला 'राजा राणीची जोडी'मधील किस्सा) या चित्रपटात दोन अभिनेत्री आहेत. ज्यांनी एकमेकींच्या प्रेमिकांची भूमिका पार पाडली आहे. अभिनेत्री अप्सरा राणी आणि नैना गांगुली यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघींची आपल्या बॉयफ्रेंडकडून प्रेमात फसवणूक झालेली असते. त्यामुळे दोघीही आतून पूर्णपणे तुटलेल्या असतात. आणि त्यानंतर समलैंगिक नात्यात अडकतात. एकमेकींच्या प्रेमात इतक्या बुडतात की जीव द्यायला आणि जीव घायला सुद्धा तयार होतात. असं काहीसं या चित्रपटाचं कथानक आहे. (हे वाचा:बॉलिवूड अभिनेत्रींची पाकिस्तानात कार्बन कॉपी; तु्म्हीच ओळखा यातली कोण खरी  ) हा चित्रपट भारतातील पहिला समलैंगिक थ्रिलर चित्रपट आहे. पोस्टर पाहून सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. मात्र सध्या लोकांना ट्रेलरवरच समाधान मानावं लागणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: