मुंबई, 12 मे- ‘राजा राणीची ग जोडी’(Raja Ranichi Ga Jodi) या मालिकेत मुख्य पात्र संजीवनी (Sanjivanee) आणि रणजीत (Ranjeet) सोबतचं एक पात्र खूप भाव खाऊन जातं ते पात्र म्हणजे ‘राजश्री ढाले पाटील’(Rajshree) म्हणजेच वाहिनीसाहेब. तापट, मोठी सून असल्याचा माज, आणि संजीवनीला सतत कमीपणा दाखवणारं असं हे पात्र आहे. हे पात्र साकारलं आहे अभिनेत्री श्रुती अत्रेनं(Shruti Atre), खलनायिका असून देखील ‘राजश्री’ हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. रणजीत आणि संजीवनी सारखेच राजश्रीचे देखील असंख्य चाहते आहेत. आज या गुणी अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आपण पाहणार आहोत. श्रुतीला ही भूमिका नेमकी कशी गवसली. श्रुती अत्रेला शालेय वयापासूनचं अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळे ती विविध शालेय आणि महाविद्यालयीन नाटकांमध्ये भाग घेत असे. त्यातून ती व्यावसायिक नाटक करू लागली. आणि अशा पद्धतीने ती मालिकांकडे वळली.
‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेत आपली वर्णी कशी लागली याबद्दल श्रुती सांगते, ‘ या मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांचा श्रुतीला एके दिवशी फोन आला. आणि त्यांनी श्रुतीला या भूमिकेबद्दल विचारणा केली. मात्र खलनायिका आपल्याला जमेल की नाही अशी तिच्या मनात शंका होती. त्यामुळे तिने इतकी उत्सुकता नाही दाखवली. मात्र त्यांनी तिला स्वतः एखादा खलनायिकेला शोभेल असा व्हिडीओ करून पाठवायला सांगितला. आणि श्रुतीने तो पटकन करून पाठवला. आणि गम्मत म्हणजे दिग्दर्शकांना तो इतका आवडला की त्यांनी या भुमिकेसाठी श्रुतीलाचं फायनल केल’. विनोद लवेकरांसोबत श्रुतीने ‘बनमस्का’ या मालिकेत काम केल होतं. (हे वाचा: मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकाराला मुंबई पुणे एक्स्प्रेसवर लुटलं) श्रुतीच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिचा आपल्या लहान बहिणीवर खुपचं जीव आहे. श्रुतीच्या लहान बहिणीच नाव श्वेता असं आहे. या दोघी बहिणी कमी आणि मैत्रिणी जास्त आहेत. बहिणीबद्दल सांगताना श्रुती म्हणते, ‘ती लहान असून सुद्धा मला नेहमी सपोर्ट करते. माझ्या प्रत्येक अडचणीत मला मोठ्या बहिणीसारख समजावते. त्यामुळे कधी कधी वाटतं की तिच माझी मोठी बहीण आहे. (हे वाचा: गौतमी देशपांडेला नवरा कसा हवा?; चाहत्याच्या प्रश्नावर दिलं भन्नाट उत्तर ) कलर्स मराठीवर सुरु असलेल्या ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेने खुपचं प्रसिद्धी मिळवली आहे. राजश्री या भूमिकेने श्रुतीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. श्रुती सध्या ही भूमिका खुपचं एन्जॉय करत आहे.