मुंबई,10 फेब्रुवारी- अभिनेत्री राखी सावंत सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिने पती आदिल दुर्रानीवर फसवणूक आणि मारहाणीचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अंधेरी न्यायालयात हजर केल होतं. न्यायालयाने आदिलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस सध्या आदिलची चौकशी करत आहेत.दरम्यान राखीने आदिलवर आणखी काही धक्कादायक आरोप करत खळबळ माजवली आहे. राखी सावंतने आता पती आदिलवर आपले न्यूड व्हिडीओ बनवून विकल्याचा आरोप केला आहे. नुकतंच ई टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत राखी सावंतने आदिल खान दुर्रानीसोबतच्या या सर्व प्रककरणाबाबत संवाद साधला. यावेळी बोलताना राखीने सांगितलं की, ‘आदिलने माझे न्यूड व्हिडीओ काढून ते काही लोकांना विकले आहेत. मी याची तक्रार सायबर विभागात केली आहे. याबाबत सायबर पोलीस तपास करत आहेत. राखीच्या या खुलाश्याने पुन्हा खळबळ माजली आहे. याआधी राखीने आदिलविरोधात फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. (हे वाचा: Rakhi Sawant-Adil Durrani: चेहऱ्यावर काळा नकाब, हातात बेड्या; राखी सावंतच्या पतीला अंधेरी कोर्टात केलं हजर ) राखी सावंतने आरोप करत म्हटलं आहे की, ‘आपल्यासोबत लग्न करुनदेखील आदिल दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. राखीने सांगितलं त्या मुलीचं नाव तनू असं आहे. तनू आणि आदिलचे अनेक रोमँटिक फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राखी पुढे म्हणाली, मला सोडून आदिल तनूसोबत तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. त्याने मला वचन देऊन आणि शपथ घेऊनसुद्धा माझी फसवणूक केली आहे. शिवाय त्याने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं म्हटलं आहे. शिवाय राखीने आदिलवर आपले पैसे आणि दागिने चोरल्याचा आरोप केला आहे. आदिल आपले दीड कोटी रुपये देणार असल्याचं तिने म्हटलं आहे. आपल्या आईच्या उपचारासाठी आदिलने वेळेत आपले पैसे परत न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोपदेखील राखीने केलाय. या सर्व प्रकरणाची तपासणी सध्या पोलीस करत आहेत.
राखी सावंतने गेल्या महिन्यात आपल्या आणि आदिलच्या लग्नाचा फोटो शेअर करत आपण लग्न केल्याचं उघड केलं होतं. आपण ७ महिन्यांपूर्वीच कोर्ट मॅरिज केल्याचं राखीने उघड केलं होतं. दरम्यान आदिलने सुरुवातीला यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं. परंतु नंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राखीसोबत लग्न झाल्याच्या बातम्यांना होकार दिला होता.