मुंबई, 8 फेब्रुवारी- बॉलिवूड-टीव्ही अभिनेत्री राखी सावंत ने आपला पती आदिल खान दुर्रानी विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतल आहे. आदिलला पकडून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. आदिलने तिच्याकडून पैसे आणि दागिने हिसकावून घेतल्याचा आरोप राखीने केला होता. राखीने असा आरोप केला आहे की, जेव्हा ती बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून गेली होती तेव्हा आदिलने आपल्या पैशांचा गैरवापर केला होता. दरम्यान आज आदिलला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. नुकतंच आदिल दुर्रानीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी कोर्टात हजर केल्याचं दिसून येत आहे. याठिकाणी आदिल आणि राखीच्या प्रकरणावर सुनावणी केली जाणार आहे. या व्हिडीओमध्ये आदिल खान दुर्रानीचा चेहरा दिसून येत नाहीय. कारण त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकण्यात आला आहे. तर आदिलच्या हातात हातकडीसुद्धा दिसून येत आहे. (हे वाचा: Rakhi Sawant: पोलीस स्टेशनच्या बाहेरच कोसळली राखी सावंत; व्हायरल VIDEO ने खळबळ ) आदिल खान दुर्रानीला काल मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.राखी सावंतने पती आदिलविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आज ओशिवरा पोलिसांनी राखीचा पती आदिल दुर्रानीला अंधेरी कोर्टात हजर केलं आहे. कोर्टाबाहेरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
राखी सावंतच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आदिलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला आज अंधेरी कोर्टात हजर केलं आहे.राखीने तिच्या आईच्या मृत्यूला आदिलला जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. आदिलने आपल्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी वेळेवर आपले पैसे न दिल्याने आईच्या मृत्यूला तो जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना राखीने म्हटलं आहे, ‘हे कोणतही नाटक नाहीय. त्याने खरोखर माझं आयुष्य उध्वस्त केलं आहे. कुराण शरीफवर हात ठेवूनसुद्धा त्याने मला फसवलं. मला मारहाण केली आणि माझे पैसेसुद्धा काढून घेतले आहेत. माझ्यासोबत लग्न होऊनसुद्धा तो दुसऱ्या असल्याचं आदिलने म्हटलं आहे.