Home /News /entertainment /

हे काय? कंगनाच्या वक्तव्यामुळे राखी सावंतला मोठा धक्का; हॉस्पिटलमध्ये झाली दाखल

हे काय? कंगनाच्या वक्तव्यामुळे राखी सावंतला मोठा धक्का; हॉस्पिटलमध्ये झाली दाखल

या वक्तव्यानं आपल्याला खूप मोठा धक्का बसला असल्याचं राखीने म्हटलं असून, आपण रुग्णालयात (Hospital) दाखल झाल्याचं सांगितलं आहे.

    नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : अभिनेत्री कंगना राणावत (Kanagana Ranaut) सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक आहे, असं आक्षेपार्ह विधान तिनं एका मुलाखतीत केलं होतं. त्यामुळं तिच्यावर टीकेची झोड उठली असून समाजाच्या सर्व स्तरांतून तिचा निषेध केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी तिचा कडाडून निषेध केला आहे. यामध्ये बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारी ड्रामा क्वीन राखी सावंतचाही (Rakhai Sawant on Kanagana Ranaut statement) समावेश आहे. झी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, कंगनाच्या या वक्तव्यानं आपल्याला खूप मोठा धक्का बसला असल्याचं राखीने म्हटलं असून, आपण रुग्णालयात (Hospital) दाखल झाल्याचं सांगितलं आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने स्वतःचा एक व्हिडिओही शेअर केला असून, ती यामध्ये कंगना राणावतला शिकवण देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसत आहे. 'मित्रांनो, मी हॉस्पिटलमध्ये आहे. नर्स माझी तपासणी करत आहे. मी आजारी आहे, शॉकमध्ये (Shock) आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार (Padamshree Award) मिळालेल्या एका अभिनेत्रीने सांगितले की, आपल्याला भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं आहे. आपल्यावर दया करण्यात आली आहे. तुमचं तुमच्या देशावर प्रेम नाही का? मी तर माझ्या देशावर खूप प्रेम करते. अशा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. भीक मागून तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आपल्या देशाच्या जवानांनी कारगिल जिंकलं, त्यांचं बलिदान व्यर्थ आहे का? ज्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत त्यामुळे मी खूप दुःखी आहे.' कंगना राणावतनं नुकतंच एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत सांगितलं होतं, की '1947 मध्ये स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली होती. 2014 मध्ये नरेंद्र मोदींचं सरकार स्थापन झाल्यानंतर खरं स्वातंत्र्य मिळालं आहे.' बिग बॉस मराठीच्या घरात जय आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी, पाहा Video तिच्या या वक्तव्याने देशभरात खळबळ उडाली असून, अनेकांनी तिचा निषेध केला आहे. संगीतकार विशाल ददलानी (Visahl Dadlan) यांनीही कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यात भगतसिंग यांचा एक फोटो असून, या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, की, 'स्वातंत्र्याची भीक मिळाली असं म्हणणाऱ्या महिलेला आठवण करून द्या की वयाच्या २३ व्या वर्षी शहीद भगतसिंग यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली. ओठांवर हसू ठेवून आणि गाणं म्हणत ते फाशी गेले. तिला आठवण करून द्या, की सुखदेव, राजगुरू, अशफाकउल्ला आणि इतर हजारो ज्यांनी इंग्रजांपुढे झुकण्यास नकार दिला, भीक मागण्यास नकार दिला. याची तिला ठामपणे आठवण करून द्या, म्हणजे पुन्हा चुकूनही ती असं बोलण्याची हिंमत करणार नाही.' आपल्या विधानावर उठलेल्या गदारोळामुळे कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली असून, त्यात 'फक्त योग्य वर्णन करण्यासाठी... 1857 हा स्वातंत्र्याचा पहिला सामूहिक लढा होता. सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि सावरकर यासारख्या वीरांनी देशांसाठी बलिदान दिलं. 1857च्या लढ्याबाबत मला माहीत आहे; पण 1947 मध्ये कोणतं युद्ध झालं होतं याची मला माहिती नाही. याबाबत मला कोणी माहिती दिली तर मी पद्मश्री परत करेन आणि माफी मागीन. कृपया यामध्ये मला मदत करा,' असं लिहिलं आहे. अशी पोस्ट करून कंगनानं तिला विरोध करणाऱ्या लोकांना खुलं आव्हान दिलं आहे.
    First published:

    Tags: Kangana ranaut, Rakhi sawant

    पुढील बातम्या